अकोला न्यूज नेटवर्क डेस्क :– दि 21 : (मूर्तिजापूर) गेल्या तीन दिवसा पूर्वी मुर्तीजापुर ते अमरावती या मार्गावरील नागोरी नागठाणा आवाजवळ एका अज्ञात महिलेचा अज्ञात ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली होती या मृत अज्ञात मृत महिलेचे अत्यविधी करण्याचा पाऊल जय गजानन आपत्कालीन पथकाच्या वतीने उचलविण्यात आला आहे .
मुर्तीजापुर येथील नागोळी नाग ठाणा जवळ जय गजानन आपत्कालीन पथकाच्या वतीने अज्ञात ट्रक च्या धडकेने महिलेचा मृत शव मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात पोहचविण्याचे कार्य करण्यात आले होते .या हृदय कापणाऱ्या अपघातात मृत महिलेच्या शवाची अस्त व्यस्त परिस्थिती झाली होती जय गजानन आपत्कालीन पथकाच्या सेनापती शेवतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेच्या मृत शव पोहचविण्याची जवाबदारी पार पडली होती .
या अपघाती घटनेला अंदाजे 3 दिवस उलटूनही महिलेची ओळख समोर आली नाही आहे त्यातच कुठल्याही प्रकारचे मृत महिलेच्या वारसदार संपर्क झाला नाही . घटनेचा प्रकार बघून अज्ञात मृत महिलेच्या अंत विधीची जवाबदारी जय गजानन आपत्कालीन पथकाच्या वतीने घेण्यात आली आहे .
मूर्तिजापूर येथील स्मशान भूमीत या महिलेचा विधीवत रित्या अंत संस्कार करण्यात आला आहे
अंत संस्कार चे कार्य आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जय गजानन आपत्कालीन पथकाचे प्रमुख सेनापती शेवतकर. भूषण तिहिले, बादशाह भाऊ ,अमोल खंडारे, आदित्य इंगोले, यांच्या पुढाकाराने घटनेच्या 3 दिवसानंतर करण्यात आले आहे या अंत संस्काराच कार्य मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस कर्मचारी दीपक कानडे आणि ज्ञानेश्वर रडके यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती पथक प्रमुख सेना पती शेवतकर यांच्या कडून मिळाली आहे