छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. शिवरायांचे लाखो भक्त आहेत जे त्यांना मनापासून मानतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगतात. महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांचा आदर्श जपणाऱ्या अकोल्यातील एका मावळ्यांची instgram वर तयार करण्यात आलेली रील आज दिवसभरात चर्चेचा विषय ठरली असून सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिवस सर्वत्र आनंदात साजरा होत आहे अकोल्यातील एका नव युवकाने मात्र आजचा दिवस साजरा करण्यासाठी अनोखी अल्पना आखली शहरातील रेल्वे स्टेशन टॉवर चौक तसेच शहरातील मुख्य ठिकाणी हातात पांढरा बोर्ड घेऊन “एक शिवजयंती अशी साजरी करू…. आपल्या घरात छोट का होईना काहितरी गोडधोड करून मुलांना शिवविचार ऐकवून शिवजयंती करू शकतो” असा संदेश लिहिलेला बोर्ड तयार करून शिवजयंती हा उत्सव नसून प्रत्येक घरात सण म्हणून साजरा करावा ही इच्छा व्यक्त केली.
piyush_yeraballi_yeda_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आजकाल आधुनिक सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत जगणाऱ्या या पिढीला नक्की महाराज कोण होते माता जिजाऊ ने महाराजांवर कोणते संस्कार रुजवले याची कीर्ती घरा घरात होणे गरजेचे आहे हा व्हिडीओ बघुन खुप बरं वाटलं. खरंच खुप चांगला उपक्रम आहे. आपले आयुष्य जगताना जसे देवाचे दर्शन घेतो त्याच प्रमाणे महाराजांना वंदन करणे आणि अशी प्रथा चालु करणे हे सर्व युवक आणि युवतींचे कर्तव्य आहे कारण महाराज हे पण आपल्याला देवा पेक्षा कमी नाही.