Saturday, September 14, 2024
Homeक्राईमएक कोटी पेक्षा जास्त रुपयांनी शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ढवळे पिता पुत्रासह कुटुंबावर...

एक कोटी पेक्षा जास्त रुपयांनी शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ढवळे पिता पुत्रासह कुटुंबावर गुन्हा दाखल,,

ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो गजानन दुतोंडे मेहेकर प्रतिनिधी दिनांक १० जून :- जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव साखरशा येथील कैलास राधाकृष्ण ढवळे व त्याचा मुलगा आशिष कैलास ढवळे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी संगणमत करून अकोला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन तूर जादा भावाने खरेदी चे आमीश दाखवून खरेदी केली मात्र ठरलेल्या वेळी या शेतमालाची रक्कम न देता फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी देऊळगाव साखरशा येतील शेतकरी कृष्णा भीमा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 27/ 12/ 2023 रोजी फिर्यादी यांच्याकडून कैलास ढवळे आशिष ढवळे यांनी सोयाबीन व तुरीची खरेदी करून मोजमाप करून घेतले.

आजच्या भावापेक्षा जादा दराने भाव देण्याची कबूल करून एक ते दोन महिन्याच्या आत पूर्ण रक्कम देतो असे सांगून बँकेचे बाऊन्स होणारे चेक दिले आणि रक्कम देण्यास टाळा टाळ करून फसवणूक केली कृष्णा चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपी कैलास राधाकृष्ण ढवळे आशिष कैलास ढवळे या पिता पुत्रासह सौ .किरण कैलास ढवळे सौ चिऊ आशिष ढवळे यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 164/ 23 कलम 406, 419 ,420, 294 ,504, 506, 34 भाद वी प्रमाणे 5 जून 2023 रोजी गुन्हा दाखल करून मा. पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक बी .बी. महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मानकर यांनी गुप्त माहितीवरून आरोपी शोध कार्य सुरू केले

आणि आरोपीची माहिती मिळवली आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद टकले पोलीसहेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण ,पोलीस कॉन्स्टेबल अडसडे यांचे पथक नेमून गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत यातील आरोपी आशिष कैलास ढवळे याला त्याच्या मामाच्या घरून मोठ्या शिताफीने चंद्रपूर येथून ताब्यात घेतले व मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले

तपास अधिकारी ठाणेदार प्रवीण मानकर

न्यायालयाने आरोपीचा सहा दिवसाचा पीसीआर मंजूर केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण मानकर रायटर पोलीस कॉन्स्टेबल विनोद फुफाटे पोलीस कॉन्स्टेबल पंढरीनाथ काकड हे करीत आहेत आरोपी आशिष ढवळे यांनी एक कोटी पेक्षा जास्त रुपयाची शेतकऱ्याची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे आजपर्यंतजवळपास 50 शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या असून अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे तेव्हा आज रोजी आरोपीने एक कोटी नऊ लक्ष रुपयाची फसवणूक केल्याची कबुली दिली तरीही तीनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने ह्या रक्कमेचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp