ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 10 जुन :- अकोला एमआयडीसी पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून दिनांक 9 जुन या एकाच दिवशी सलग दोन कारवाया केल्या यातील एका फरार आरोपीस अटक करण्यात आली तर दुसरी कारवाई ही प्रतिबंधित गुटक्यावर केली असून या आरोपी कडून लखोंचा मुद्देमाल जप्त केला

सविस्तर हकीकत अशी की एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 16 जानेवारी 2020 रोजी 324, 506 हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपी कलम 324,506 भादंवी मधील आरोपी शेख अयुब शेख बिस्मील्ला वय 43 वर्षे रा सुंदर नगर शिवणी हा त्या दिवशी पासून फरार झाला होता पोलिसांनी याचा कसून शोध घेतला पण हा शातीर आरोपी पोलिसांची भनक लागताच फरार होत

पण म्हणतात ना की “कानून के हात लंबे होते है” अगदी त्याच म्हणी प्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशन चे सह पोलीस निरीक्षक किशोर वानखेडे सदर आरोपी हा सुंदर नगर शिवणी येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचला आणी त्यात चार वर्षांपासून फरार असलेला आरोपी बरोबर अडकला .

गुटक्याची मोठी कारवाई!

तर दुसरी कारवाई ही प्रतिबंधित गुटक्यावर करण्यात आली दिनांक 09 जुन 2023 रोजी एम आय डी सी पोलिसांना स्टेशन च्या येथील डि.बी. पथकास खत्रिशिर माहिती मिळाली की आकोला कडून शिवणी कडे लाल रंगाची बजाज मेक्सीमा गाड़ी नम्बर एम एच 30 बी.डब्ल्यु. 1080 मध्ये शासन प्रतिबंदित गुटखा घेवून शिवणी येथे विक्री करण्यासाठी येत आहे

त्यावरून नॅशनल हायवे एसबीआय बँक शाखा पि के व्ही येथे नाकाबन्दी केली असता यातील आरोपि मो हुसैन मो अनिस हिंगोरा वय 20 वर्षे रा औरंगजेब कॉलनी अकोट फाईल अकोला हा बजाज मेक्सीमा गाडी मध्ये शासन प्रतिबंदित गुटखा ज्यात वाह विमल, नजर असा माल व बजाज मेक्सीमा गाड़ी , मोबाईल कि अंदाजे 40,000/- रू असा एकुण 2 लाख 31 हजार 100/- रू चा माल जप्त करण्यात आल्याने वरील आरोपि विरुद्ध पोलीस स्टेशन एम आय डीसी येथे भादवि कलम 328, व गुटखा प्रतिबंदक कायद्यानवाये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वरील दोन्ही कारवाया या अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मर्दर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर वानखेडे एएसाय दयाराम राठोड, पोहेकॉ विजय अंभोरे, नापोकाॅ सतिष, नापो काॅ सुनिल यांनी केली.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!