ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला दि.9 – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली आहे. ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी शरद पवार यांना दिली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai CP) भेट घेऊन तक्रार केली आहे. यावर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्थेवर (Law and Order) माला विश्वास आहे, त्यामुळे याची चिंता नाही, असे पवार म्हणाले.
कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील कायदा आणि सुवव्यस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत… त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असेही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, धमकीची मला कोणतीही चिंता नाही. कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असं पवार म्हणाले.
राज्य सरकारकडून गंभीर दखल
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.