ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला दि.9 – बॉलिवूड सिंगर नेहा कक्कडनं नुकताच तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिचे सर्व जवळचे मित्र तिच्यासोबत पार्टी करताना दिसले. नेहानं नुकतेच तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मात्र तिचे व्हिडिओ पाहून चाहत्यांना मात्र एकचं चिंता लागून राहिली आहे. नेहानं पोस्ट करत म्हटलं आहे की, मी माझा वाढदिवस माझे आई-वडील आणि बहीण सोनू कक्कडसोबत साजरा केला. या व्हिडिओत एक व्यक्ती मिसिंग होता, तो म्हणजे नेहाचा नवरा रोहनप्रीत सिंग. त्यामुळेच नेहाच्या चाहत्यांना रोहनप्रीत सिंग सेलिब्रेशन करताना का नव्हता, या दोघांच्यात सगळं ठीक तर आहे ना..असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत.
नेहाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अशा प्रकारे माझ्या वाढदिवसाची सुरुवात झाली.. या फोटोमध्ये नेहा तिच्या आई-वडिलांसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. यानंतरही नेहाने आणखी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात तिची संपूर्ण गर्ल गँग तिच्यासोबत दिसत आहे.
नेहाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तिच्या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या मित्रांसोबत चायपार्टी केली होती. फोटो आणि व्हिडिओमध्ये नेहा तिचा भाऊ टोनी कक्कड, बहीण सोनू कक्कड, क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि इतर मित्रांसोबत दिसत आहे. मात्र, या सगळ्यात नेहाचा पती रोहनप्रीत सिंग कुठेही दिसत नाही. यावर गायकाच्या चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओमध्ये रोहनप्रीत सिंग कुठेही का दिसत नाही, असा सवालही अनेक युजर्सनी केला आहे. नेहाच्या या पोस्टवर कमेंट करत एका युजरने विचारलं आहे की, ‘रोहनप्रीत कुठे आहे?’ असाच प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे, ‘ठीक आहे, पण रोहनप्रीत कुठे आहे?’ एका युजरने विचाचरलं आहे की, नेहा नवरा कुठे आहे, कुठेच दिसत नाही…एकानं तर थेट विचारल आहे की, ‘रोहनप्रीत कुठे आहे, दोघे वेगळे झाला आहात का..? तर काहींनी विचारलं आहे की, रोहनप्रीतनं तुझ्यासाठी बर्थडे पोस्ट का शेअर केलेली नाही..अशा असंख्य कमेंट नेहाच्य़ा या फोटों व व्हिडिओवर आल्या आहेत. हे क्यूट कपल खरचं वेगळं झालं आहे की काय..अशी चिंता चाहत्यांना सतावत आहे.