अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै२०२३ :-
पेट्रोल-डिझेलच्या किमती १० रुपयांनी कमी होऊ शकतात. एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत १५ टक्के घसरण हे त्याचे कारण आहे. १० जुलै रोजी कच्चे तेल ३५ टक्क्यांनी स्वस्त झाले होते.
मात्र, यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटची कपात केली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोल १०० रुपयांच्या वर आणि डिझेल ९० रुपयांच्या वर आहे.