महापालिकेच्या वतीने मान्सुनपूर्व नाला सफाईचे काम सुरु आहे. चारही झोन मिळून २०० पेक्षा अधिक नाले आहेत. शहराच्या अनेक भागात सिमेंट कॉक्रिटच्या मोठ्या नाल्यावर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाचा मनपाने सफाया केला आहे. त्यामुळे नालेसफाई व्यवस्थित करता येणार आहे.
मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई:मान्सुनपूर्व नाला सफाईत अडथळा ठरलेल्या अकोट फैल भागातील अतिक्रमणाचा सफाया
अकोला4 दिवसांपूर्वी
महापालिकेच्या वतीने मान्सुनपूर्व नाला सफाईचे काम सुरु आहे. चारही झोन मिळून २०० पेक्षा अधिक नाले आहेत. शहराच्या अनेक भागात सिमेंट कॉक्रिटच्या मोठ्या नाल्यावर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाचा मनपाने सफाया केला आहे. त्यामुळे नालेसफाई व्यवस्थित करता येणार आहे.
अनेकांनी बाथरुम, टिनशेड, संरक्षक भिंत, भांडारघर बांधले. या प्रकारामुळे नाला सफाईचे काम करताना अडथळे निर्माण झाले होते. महापालिका प्रशासनाने ही बाब लक्षात घेवून अतिक्रमण धारकांनी केलेले अतिक्रमण स्वत: काढावे त्यांचे नुकसान होवू नये, यासाठी वृत्तपत्रातून जाहीर नोटीसच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. मात्र जाहीर सुचना दिल्यानंतरही अतिक्रमण काढले नव्हते.
पहिल्या टप्प्यात महापालिका अतिक्रमण विभागाने उत्तर झोन येथील अकोट फैल भागातील साधना चौक ते आंबेडकर चौक ते डम्पींग ग्राउंड पर्यंतचे नाल्याचे बांधकामात अडथळे निर्माण करणारे धापे, टीन शेड, कंपाउंड वॉल, ओटे आदी कच्चा आणि पक्क्या स्वरुपाचे अतिक्रमण काढले. ही कारवाई उत्तर झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, मनपा सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे तसेच मनपा अतिक्रमण विभागातील आणि झोन कार्यालयातील तसेच अभिकर्ताच्या कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान अद्यापही शहराच्या विविध भागात मोठ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे नालासफाईस अडचणी येत आहेत. नाला सफाई न झाल्यास पावसाळ्यात सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या नाल्यावर केलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:काढावे अन्यथा महापालिकेच्या वतीने या अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.