अकोला न्यूज नेटवर्क डेस्क:— दि :20 :–अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमी परिसरातील एका रद्दीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती यावेळी अग्निशामक दल आणि रामदास पेठ पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2024/01/IMG20240121103952_01-1024x576.jpg)
मोहता मिल स्मशानभूमी परिसरातील नदीकाठच्या एका रद्दीच्या दुकानाला सकाळी 9 वाजता च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी आगीचे रुद्र रूप बघतात स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच हे रद्दीचे दुकान इतर घरां च्या जवळ असल्याने इतर परिसरातील घरांना पण या आगीचा धोका निर्माण झाला होता.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2024/01/IMG20240121104456_01-1024x576.jpg)
यावेळी परिसरातील नागरिकांनी या आगीवर नियंत्रणासाठी आग विझविण्याचा प्रयत्नही केला तसेच स्थानिक नागरिकांनी वेळेवरच अग्निशामक दल आणि रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे या आगीच्या घटनेची माहिती दिली होती अग्निशामक दलाला या आगीच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मोहतामिल परिसरात चे घटनास्थळ गाठले आणि आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2024/01/IMG20240121104018-1024x576.jpg)
ही रद्दीची दुकान बिलाल खान आणि तौसिफ खान यांची असून यांचे अंदाजे लाखोच्या किमतीचे नुकसान यावेळी झाल्याची माहिती समोर येत आहे तसेच या दुकानाला आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नसून मनपाचे अग्निशामक दल या आगेवर नियंत्रण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे सध्या अग्निशामक दलाच्या अंदाजे दोन ते तीन गाड्यांचा वापर या आगीवर झालेला आहे.
![](https://gtplnewsakola.in/wp-content/uploads/2024/01/IMG20240121111031-1024x461.jpg)
ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलातील निखिल आपोतीकर प्रदीप तायडे शुभम बोराडे अभिजीत मनोहर प्रकाश बनकर वाहन चालक पंकज जयस्वाल अनिल खिरोडकर तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते