Tuesday, May 21, 2024
Homeदेशराज्यपाल रमेश बैस यांचा अकोला जिल्हा दौरा

राज्यपाल रमेश बैस यांचा अकोला जिल्हा दौरा

ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला दि.9 – राज्यपाल रमेश बैस हे शनिवार दि. 10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे शनिवार दि.10 रोजी सकाळी 8 वा. 38 मि.नी अकोला रेल्वे स्थानक येथे रेल्वेने आगमन. सकाळी 8 वा.45 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण व आगमन. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, अकोला येथे राखीव.

सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथून शासकीय वाहनाने ग्रॅड जलसा, रिधोरा रोड, अकोलाकडे प्रयाण व सकाळी 11 वा.15 मि.नी आगमन. सकाळी 11 वा.20 मि. ते 1 वाजेपर्यंत लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. 40 मि.नी ग्रॅड जलसा, रिधोर रोड, अकोला येथून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाकडे प्रस्थान व राखीव.

दुपारी 2 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कुलगुरुसोबत आढावा बैठक. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव. सायं. पाच वाजता शेगाव जि. बुलडाणाकडे शासकीय वाहनाने रवाना, सायं. सहा वा. संत गजानन महाराज मंदीर, शेगाव येथे भेट व दर्शन, रात्री 8 वा. 55मि.नी रेल्वे स्टेशन येथे आगमन व 9 वा.3 मि.नी शेगाव रेल्वेस्टेशन येथून रेल्वेने मुंबईकडे रवाना.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!