Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर ट्रक व बोलेरो पिकअप वाहनाचा भीषण अपघात;...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर ट्रक व बोलेरो पिकअप वाहनाचा भीषण अपघात; एक जागी ठार

ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 11 जुन :- अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग हा मृत्युचा महामार्ग ठरत असून दररोज या मार्गांवर अपघाताचे सत्र सुरूच आहे शुक्रवारी याचं महामार्गांवरील टैंकर व दुचाकीच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डाळंबीजवळ घडली होती. त्यात आणखी एक भर पडली असून आज सकाळी झालेल्या अपघात आणखी एक जन ठार झाला.

राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील खरब खरबडी गावाजवळ ट्रक व बोलेरो पिकप चा भीषण अपघात एक जण जागी ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 11 जून रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला.

https://www.instagram.com/reel/CtWCZNZAopI/?igshid=MzRlODBiNWFlZA==


घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार मुंबईवरून पटना जात असलेली नवीन बोलेरो पिकप तात्पुरता क्रमांक एमएच 47 टीसी 098/191 वाहन डाळिंब भरून जात असताना राष्ट्रीय महामार्गावर खरब खरबडी गावाजवळ अमरावती वरून अकोल्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच 28 एबी 8917 चा भीषण अपघात घडला.

या अपघातात बोलेरो पिकअप चा चालक अजयसिंग अमरनाथसिंग रा. शिवराणी तालुका मिर्जापुर उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर ग्रामीण पोलीस हेट कॉन्स्टेबल दीपक कानडे व ज्ञानेश्वर रडके पोहोचून कारवाई सुरू केली

जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, अमोल खंडारे यांना पाचरण करून मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके करीत आहे.कारवाई सुरू असल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp