ANN अकोला नेटवर्क ब्युरो दिलीप जाधव बार्शीटाकळी दि. 6 जुन :- पिंजर वनपरिक्षेत्रात सोमवारी एका कोल्ह्याचा मृतदेह आढळून आला, त्याची शिकार करण्यात आली का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे, या वनपरिक्षेत्राअंतर्गत यापूर्वी दोन पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता, या कोल्ह्याचा मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी केली आहे, पिंजर वनपरिक्षेत्र अंतर्गत पातुर नंदापूर बीटमध्ये तीन महिन्यांपूर्वी एका पट्टेदार वाघाचा आकस्मिक मृत्यू झाला होता, त्यानंतर दाहा ते पंधरा दिवसांपूर्वी बार्शीटाकळी तालुक्यातील सकनी येथील रेल्वे रूळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता.
परत तिसऱ्यांदा पिंजर वनपरिक्षेत्र अंतर्गत सावरखेड शिवारात एका कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे, कोल्ह्याच्या पाठीवर आणि पायावर गंभीर जखमा आहेत, त्यामुळे या कोल्ह्याची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे, पाच जूनला सोमवारी पर्यावरण दिन होता याच दिवशी पिंजर वनपरिक्षेत्रात कोल्ह्याचा मृत्यू झाल्याने पर्यावरण प्रेमींनी नारजी व्यक्त केली, या कोल्ह्याची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे ठरवण्यात येईल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले,मात्र सावरखेड शिवारात या कोल्ह्याने दोन ते तीन जणांना चावा घेतल्याची माहिती आहे, त्यानंतर त्याचा मृतदेह एका शेतात नेऊन टाकला की काय,की तिथेच त्यांची हत्या झाली असावी, अशी चर्चा या भागात सुरू आहे……