ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 6 जुन :- मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम धानोरा वैद्य येथे विहिरीत पोहायला गेलेल्या 23 वर्षे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 5 जून रोजी सकाळच्या सुमारात घडली.
आज सहा जून रोजी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील ग्राम धानोरा वैद्य येथील रहिवाशी उच्चशिक्षित ऋषिकेश विनोद महल्ले वय 23 हा आपल्या मित्रासोबत शांताबाई यांच्या शेत शिवारातील विहिरीवर पोहायला गेला असता त्याला पोहणे येत नसतानाही त्याने थेट विहिरीत उडी घेतली. मात्र विहिरीतील गाळात फसल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. सदर विहिरीत दहा फुट असल्याचा अंदाज आहे. या युवकाच्या मृत्यूप्रकरणी अविनाश रमेश महल्ले यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल सुनील नवलाखे करीत आहे.