घोड्याच्या नालेचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या घोड्याची नाल शनीची महादशा आणि त्याच्या प्रकोपापासून रक्षण करते. काळ्या घोड्याची नाल मोहरीच्या तेलात ठेवा आणि शमीच्या झाडाखाली गाडून टाका.

असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनीच्या सर्व समस्या दूर होतील. हा उपाय केल्याने शनिदेवाची कृपा होते. घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल टांगल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि घरातील सदस्यांचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात. दारावर घोड्याची नाल टांगल्याने घरात सुख-शांती नांदते.

घरामध्ये घोड्याची नाल लावल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. जर तुम्ही नोकरी आणि व्यवसायामुळे त्रासलेले असाल तर बोटात घोड्याच्या नालीची अंगठी घाला. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि नोकरी-व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात.काळ्या घोड्याची खरी नाल तीच असते जी स्वतःहून घासून उतरलेली असते.

केवळ अशा काळ्या घोड्याची नाल पूर्णपणे सक्रिय मानली जातो. घोड्याचा नाल सर्व बिघडलेली कामे घडवून आणते. काळ्या घोड्याच्या पुढच्या दोन पायांपैकी उजव्या बाजूला असलेली नाल सर्वोत्तम मानली जाते. त्याचा प्रभाव जास्तीत जास्त राहतो.

जे लोक शनिशी संबंधित व्यवसायात आहेत किंवा शनीच्या नकारात्मक प्रभावाने त्रस्त आहेत, अशा लोकांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर घोडीची नाल लावावी. काळ्या घोड्याच्या वेगवेगळ्या पायांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या ग्रहांच्या स्थितीनुसार बदलतो. ज्या लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे त्यांनीही ही नाल आपल्या दारावर लावावी. शनिवारी संध्याकाळी त्याची प्रतिष्ठापना केल्यास फायदा होतो.

नाल बसवण्यापूर्वी मंत्रांद्वारे जागृत करून ती सक्रिय केली पाहिजे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. GTPL न्यूज त्याची हमी देत नाही.)


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!