Friday, July 19, 2024
Homeशैक्षणिकशिक्षणाची संधी: पीएच.डी.साठी संधी

शिक्षणाची संधी: पीएच.डी.साठी संधी

ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवून संशोधन करण्यासाठी दरमहा रु. ४७,०००/- ची स्टायपेंड मिळवून Ph. D. करावयाची आहे किंवा असिस्टंट प्रोफेसर व्हावयाचे आहे? भारतीय विद्यापीठ आणि कॉलेजेसमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ पद भरतीकरिता आणि फक्त Ph. D. प्रवेशाकरिता पात्रता निश्चित करण्यासाठी ८३ विषयांमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ( UGC) – नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ( NET June २०२४) परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. UGC- NET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. (जून आणि डिसेंबर)

पात्रता – ह्युमॅनिटिज आणि सोशल सायन्स (लँग्वेजेससह), कॉम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स इ. (Appendix- III मध्ये नमूद केलेल्या) विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग/ तृतीयपंथी उमेदवारांना ५० टक्के गुण आवश्यक.) ४ वर्षं कालावधीची पदवी परीक्षा किमान ७५ टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवार JRF आणि Ph. D. प्रवेशासाठी पात्र असतील (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस / दिव्यांग उमेदवारांना ७० टक्के गुण आवश्यक.)

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार NET परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना NET २०२४ चा निकाल जाहीर होणाऱया दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पात्रता परीक्षा आवश्यक त्या गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. उमेदवारांनी ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या विषयासाठीची NET परीक्षा लिहिणे आवश्यक. जर पदव्युत्तर पदवीचा विषय NET विषयांच्या यादीत नसल्यास त्या विषयाशी संबंधित विषय NET परीक्षेसाठी निवडावा.

वयोमर्यादा – (दि. १ जून २०२४ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ३० वर्षेपर्यंत. (इमाव (केंद्रीय यादीत असलेल्या जातींसाठी)/ अजा/ अज/ दिव्यांग/ तृतीयपंथी आणि महिला उमेदवारांसाठी – ३५ वर्षेपर्यंत)

असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि Ph. D. प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता – कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. आरक्षण – १५ टक्के जागा अजासाठी, ७.५ टक्के जागा अजसाठी, २७ टक्के जागा इमावसाठी, १० टक्के जागा जनरल इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स (General EWS) साठी, ५ टक्के जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

परीक्षा पद्धती – लेखी परीक्षा ( OMR बेस्ड मोड) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न – दोन पेपर्स. पेपर-१ – ५० प्रश्न, १०० गुण (टीचिंग/ रिसर्च ॲप्टिट्यूड जाणून घेण्यासाठी टेस्ट ऑफ रिझनिंग ॲबिलिटी, रिडींग कॉम्प्रिहेन्शन, डायव्हर्जंट थिंकिंग आणि जनरल अवेअरनेस विषयांवर आधारित).

पेपर-२ – १०० प्रश्न, २०० गुण निवडलेल्या विषयावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी. परीक्षेचा कालावधी ३ तास (१८० मिनिटे). सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. UGC NET June २०२४ साठीची विषयांची यादी ( Appendix- II) आणि त्यांचे कोड नंबर जाहिरातीच्या Appendix- IV मध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम https:// www. ugcnetonline. in/ syllabus. new. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रश्नपत्रिकेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल. (भाषा (लँग्वेजेस वगळता))

ऑनलाईन अर्जात निवडलेल्या माध्यमातूनच प्रश्न विचारले जातील.

चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. ‘असिस्टंट प्रोफेसर’ किंवा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी पात्रता उमेदवारांच्या UGC NET परीक्षेतील दोन्ही पेपर्समधील सरासरी गुणवत्तेवर आधारित निश्चित केली जाईल. जे उमेदवार फक्त ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांना JRF पुरस्कारासाठी ( award) विचारात घेतले जाणार नाहीत. जे उमेदवार JRF पुरस्कारासाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात किंवा संबंधित विषयात रिसर्च संशोधन करता येईल. तसेच ते ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदासाठी पात्र ठरतील.

परीक्षा केंद्र – उमेदवारांनी आपल्या पसंतीची ४ परीक्षा केंद्रे निवडावीत. (Appendix- VII) मध्ये सिटी कोड नंबर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,१५०/-; जनरल ईडब्ल्यूएस /इमाव – रु. ६००/-; अजा/ अज/दिव्यांग/ तृतीयपंथी – रु. ३२५/-. परीक्षा शुल्क दि. ११/१२ मे २०२४ (२३.५० वाजे) पर्यंत भरता येईल.

पीएचडी. फेलोशिप स्टायपेंड JRF साठी (३७,००० २७ टक्के एचआरए) रु. ४६,९९०/- दरमहा. २ वर्षांनंतर रफा साठी (रु. ४२,०००/- २७ टक्के एचआरए) रु. ५३,३४०/- दरमहा दिले जाते. UGC- NET २०२३ परीक्षा १६ जून २०२४ रोजी घेतली जाईल. NTA वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. ऑनलाईन फॉर्ममध्ये काही सुधारणा/बदल करावयाच्या असल्यास दि. १३ ते १५ मे २०२४ (२३.५० वाजे)पर्यंत करेक्शन विंडो उपलब्ध असेल.

ऑनलाइन अर्ज https:// ugcnet. nta. ac. in/; या संकेतस्थळावर दि. १० मे २०२४ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत. (Registration & gt; Application Form & gt; Payment of Fees)

एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी भरती

१२ वी विज्ञान (पीसीबीएम विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-२०२४ ( NEST-२०२४) बेसिक सायन्सेस-बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समधील ५ वर्षे इंटिग्रेटेड एम.एस्सी. प्रोग्रॅम (२०२४-२९) साठी एनईएसटी -२०२४ प्रवेश परीक्षा जाहीर. यातून मुंबई विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस ( UM- DAE CEBS) मुंबई प्रवेश क्षमता एकूण ५७ (अजा – ९, अज – ४, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २३) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयएसईआर), भुवनेश्वर येथील प्रवेश क्षमता २००. (५ टक्के जागा विकलांग उमेदवारांसाठी राखीव) ५ वर्षांच्या इंटिग्रेटेड एम.एस्सी. प्रोग्रॅमसाठी प्रवेश परीक्षा ३० जून, २०२४ रोजी अहमदनगर, अकोला, छ. संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, जळगाव इ. देशभरातील १२९ केंद्रांवर घेतली जाणार. निवडलेल्या उमेदवारांना रु. ६०,०००/- वार्षिक स्कॉलरशीप DISHA प्रोग्रॅमसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीतर्फे दिली जाईल. शिवाय इन्टर्नशिपसाठी दरवर्षी रु. २०,०००/- दिले जातात.

पात्रता – २०२२, २०२३ मध्ये १२ वी (बायोलॉजी/ केमिस्ट्री/ फिजिक्स/ मॅथ्स) या विषयांसह किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण किंवा २०२२ ला १२ वी (विज्ञान) परीक्षेला बसणारे उमेदवार पात्र आहेत. (अजा/ अज/ दिव्यांग यांना ५५ टक्के गुण आवश्यक)

वयोमर्यादा – कोणतीही वयाची अट नाही.

परीक्षा पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ज्यात बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या चार विषयांच्या ११ वी/१२ वी NCERT/ CBSE अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी ६० गुण (४ विषयांपैकी बेस्ट ऑफ थ्रीनुसार १८० गुणांमधून) NISER आणि UM- DAE CEBS साठी वेगवेगळी मेरिट लिस्ट बनविली जाईल. NEST परीक्षेचा निकाल www. nestexam. in या संकेतस्थळावर दि. १० जुलै २०२४ रोजी जाहीर केला जाईल. NEST परीक्षेचा अभ्यासक्रम https:// ncert. nic. in/ syllabus. php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जाचे शुल्क – खुला, ईडब्ल्यूएस व इमाव गटांतील पुरुष उमेदवारांसाठी रु. १,४००/- (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला यांना रु. ७००/-).कोर्स विषयी विस्तृत माहिती www. niser. ac. in आणि www. cbs. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ॲडमिट कार्ड १५ जून २०२४ पासून NEST च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज www. nestexam. in या संकेतस्थळावर दि. ३१ मे २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. ई-मेल आयडी – nest- exam@niser. ac. in. हेल्पलाईन नं. ०२२-६१०८७५१० शंकासमाधानासाठी यांना लिहा Chief Co- ordinator, UM- DAE, CEBS, Nalanda Building, University of Mumbai, Vidyanagari Campus, Kalina, Santacruz ( E.), Mumbai – ४०० ०९८. ई-मेल आयडी nest@cbs. ac. in या प्रोग्राममधून अतिउत्तम कामगिरी करणारे उमेदवार BARC ट्रेनिंग स्कूलच्या ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर पदांच्या निवडीसाठी होणाऱ्या इंटरह्यूकरिता पात्र ठरतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp