ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. मंगळवार 13 जुन :- कधी एखाद्या हरणाला साप खाताना पाहिले आहे का? प्रश्न अजब वाटत आहे ना. तर हा व्हिडिओ पाहा. डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल या क्लिपने लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. ही घटना कुठे व कधी घडली याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. मात्र लोकांनी एक हरण सापाला गवत खाल्ल्याप्रमाणे चावून चावून खाताना पाहून लोक सुन्न झाले. कारण कोणी कल्पना केली नसेल की, गवत व झाडांची पाने खाणारे हरिण साप सुद्धा खाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की, घोर कलयुग आले आहे.

काळाबरोबर सवयीही बदलत आहेत –
व्हायरल व्हिडिओ २१ सेकंदाचा आहे. त्यामध्ये स्पष्ट पाहू शकता की, एक हरिण रस्त्याच्या कडेला उभे आहे व त्याच्या तोंडात साप असून ते सापाला चावून चावून खात आहे. जेव्हा एका कार चालकाने हरणाची अजब कृती पाहून त्याने हे दुर्मिळ दृष्य कॅमेऱ्यात कैद केले व हा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्टकेला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, ही क्लिप पाहूनही अनेक लोकांचा यावर विश्वास बसला नाही की, असेही होऊ शकते. वृत्त लिहीपर्यंत या क्लिपला हजारो लाइक्स आणि व्यूज मिळाला आहेत. अनेक युझर्स यावर कमेंटही करत आहेत. एकाने लिहिले आहे की, ही खूपच अजब गोष्ट आहे. दुसऱ्या एका युझर्सने लिहिले की, घोर कलयुग आले आहे, शाकाहारी प्राणी मांसाहारी बनत आहेत. त्याचप्रमाणे अन्य एका यूझरने लिहिले की, काळ बदलत आहे तशा सवयीही बदलत आहेत.

हा व्हिडिओ’भारतीय वन सेवा’ (IFS) अधिकारी सुशांत नंदायांनी रविवारी, ११ जून रोजी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, निसर्गाला व्यवस्थित समजून घेण्यासाठी कॅमेरा आपली मदत करत आहे. होय, शाकाहारी प्राणी कधी-कधी साप खातात! आता ही शॉकिंग क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लेटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

पाहा आश्चर्यचकीत करणारा व्हिडिओ –

https://www.instagram.com/reel/CtbNh_hgN7D/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!