Monday, May 5, 2025
Homeब्रेकिंगअवैध दारूची वाहतूक करतांना एकास रंगेहात पकडले पातूर पोलिसांची कारवाई ; हजारोंचा...

अवैध दारूची वाहतूक करतांना एकास रंगेहात पकडले पातूर पोलिसांची कारवाई ; हजारोंचा मुद्देमाल जप्त

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३ :- दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करतांना एकास रंगेहात पकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर कारवाई केली. काल दि. 26 जुलै रोजी पातूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक इसम दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली असता नाकाबंदी करून प्रो-रेट केली असता एकास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

कापशी येथे अकोला- वाशिम रस्त्यावर नवीनच बनलेल्या अंडरपास पुलाजवळ एक दुचाकीस्वार अवैध दारूची वाहतूक करतांना पातूर पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले असून अटक केलेल्या इसमाचे नाव नंदू सुभाष बरगे (26) रा.वाडेगाव असे असून त्याच्याजवळून 1680 रुपये किंमतीच्या टॅगो पंच कंपनीच्या 180 मिली 24 बॉटल,90 मिलीच्या 100 बॉटल किंमत-3500,एक विव्हो कंपनीचा मोबाईल किंमत 8000 रुपये व 70,000 रुपये किंमत असलेली एक पल्सर कंपनीची मोटरसायकल असा एकूण 83100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ए.एस.आय. अरविंद पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंदू बरगे यांच्याविरोधात कलम 65 ई. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. अरविंद पवार,विकास जाधव,रामानंद भवाने,निलेश राठोड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp