Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडी10th Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात

10th Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ :- राज्यात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत (Maharashtra SSC Exam) आहे यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आलं आहे परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा (10th Exam) आहे कारण उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे आज माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे

उद्या दहावीचा पहिला पेपर
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे राज्य मंडळातर्फे माध्यमिक शातान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार (Maharashtra SSC Exam 2024) आहे उद्या दहावीचा पहिला पेपर आहे दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण वळण असते दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट व्हायला तागतात

परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू (10th Exam Starts From Tomorrow) नये परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे

भरारी पथकाची नेमणूक
विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा विचार करु नका कारण गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे परीक्षेदरम्यान कुणी गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई (SSC Board Exam 2024) केली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे यावर्षी १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते त्या अनुषंगाने राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली (10th Exam Starts From Tomorrow) आहे परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!