अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-आज कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे.आज कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे. एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल व श्री. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. एकादशी निमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांनी चंद्रभागेत स्नानासाठीही मोठी गर्दी केली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील विविध मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरते बंद केले आहेत, वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. आषाढी यात्रेनंतर साजरी होणारी ही दुसरी मोठी एकादशी आहे. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचे संकेत वाढ झाल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
आज कामदा एकादशी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी ; दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत
RELATED ARTICLES