Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीघराच्या अंगणातच लावली गांजाची झाडं. पोलिसांची पडली नजर तब्बल १२ किलो गांजा...

घराच्या अंगणातच लावली गांजाची झाडं. पोलिसांची पडली नजर तब्बल १२ किलो गांजा जप्त

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जानेवारी २०२४:- दहिहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोहट्टा बीटमध्ये करतवाडी येथे एका इसमाने चक्क घराच्या अंगणातच गांजाची झाडं लावली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करीत तब्बल १२ किलो गांजा जप्त केला. दहिहांडा पोलिस स्टेशन हद्दीत ता. २९ जानेवार रोजी ठाणेदार सहा पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे हे गस्तीवर असताना चोहट्टा बिट हद्दीतील करतवाडी येथे एका इसमाने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली. स्वतःचे घराचे अंगणात गांजा लावल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना या संदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाईसाठी ठाणेदार योगेश वाघमारे यांनी एक पथक तयार केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल हे स्वतः या पथकासोबत कारवाईत उपस्थित होते. पोलिस पथकाने करतवाडी येथे कारवाई करीत अजाबराव रामदास किरडे (४६ वर्ष) याच्या घराच्या परिसराची पाहणी केली. तेव्हा त्याने स्वतःचे घराचे अंगणात कंपाउंड वॉलचा आडोसा घेवून १२ गांजाची झाडे लावल्याचे आढळले. पोलिस पथकाने झाडांचा पंचासमक्ष पंचनामा करून १२ किलो वजनाची सुमारे एक लाख २० हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे ताब्यात घेतली. आरोपी अजाबराव किरडे याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे व सह पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे, पोउपनि अरून मुंढे, एएसआय अंबादास नेरकर, पोलिस कर्मचारी गोपाल अघडते, सुधाकर सिरसाट, शरद सांगळे, अनिल भांडे, कमोद लांडगे, योगेश करनकार, रामेश्वर भगत, निलेश देशमुख, श्रध्दा वानखडे, एएसआय प्रकाश महाजन, सुधीर कोरडे, हेमंत दासरवार यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp