Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ गुरूवारी व्हायरल झाला असून याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा सगळीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ही घटना दुर्दैवी असून मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. एनसीसीचे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे.

बुधवारी घटना घडली. त्याचा व्हिडीओ मात्र गुरूवारी व्हायरल झाला. याबाबत महाविद्यालयानक्त्या संबंधित विद्यार्थ्यावर कारवाईची भूमिका घेतली आहे. प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या की, ज्याने मारहाण केली तो विद्यार्थी विज्ञान शाखेचा आहे. कालच या घटनेबाबत वि.प्र.मंकडे कारवाईसाठी पाठवले होते. एनसीसीने आतापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. हे घडत असताना दोन मुले तिथे आली असती तर ही घटना तिथल्या तिथे थांबवता आली असती. त्या विद्यार्थ्यावर कारवाई होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp