Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीअतिक्रमण जैसे थे; मनपाची कार्यवाई शून्य.कारवाईनंतर गांधी रोडवरील फेरीवाल्यांचं पुन्हा बस्तान

अतिक्रमण जैसे थे; मनपाची कार्यवाई शून्य.कारवाईनंतर गांधी रोडवरील फेरीवाल्यांचं पुन्हा बस्तान

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४:- मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणची समस्या निकाली काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉकर्स झोनला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अद्यापही फेरीवाले मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ७० लाखाहून अधिक खर्च करून मनपा प्रशासनाने हॉकर्स झोन उभारले आहे. गांधी रोडवरील भाटे क्लबच्या मैदानावर दोनशे ते अडीचशे हॉकर्स व्यवसाय करू शकतील अशा पद्धतीने नियोजन करून महापालिकेने ७० सग्रहित छायाचित्र लाखाहून अधिक खर्च करून हॉकर्स झोन तयार केला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होऊनही या ठिकाणी हॉकर्स व्यवसाय करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांनी पुन्हा मुख्य रस्त्यालगत हातगाड्या लावून अतिक्रमण करीत व्यवसाय सुरू केले आहेत.

दरम्यान त्या अनुषंगाने अतिक्रमण विभागाने मुख्य बाजारपेठेत या फेरीवाल्यांना हुसकावून लावण्याची कारवाई सुरु केली होती. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणात १० दिवस गेल्याने कुठलीही कार्यवाही झाली नाही. सोमवार पासून कार्यवाही होणे अपेक्षित असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून काहीही झाले नाही. त्यामुळे मुख्य बाजारपेठ, गांधी रोड, नवीन कापड बाजार, जैन मंदीर परीसरात पुन्हा पथ विक्रेत्यांनी अतिक्रमण थाटले आहे. आयुक्त कविता द्विवेदी यांनी शहरातील अतिक्रमणची समस्या निकाली

काढण्यासाठी हॉकर्स झोन उभारण्याचा निर्णय घेतला होता. तातडीने ही कार्यवाही करुन अडीचशे ते तिनशे हॉकर्सला या झोनमध्ये बसवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले होते मात्र, अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे. ही बाब पाहता हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करण्यास फेरीवाले तयार नसल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp