Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मनोहर जोशी यांनी खासदार, आमदार, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, मुंबई महापालिकेचे नगरसेवक अशा पदांवर काम केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp