Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीमिनी मंत्रालयाच्या सभेत इतरांना अचानक कंठ फुटतो

मिनी मंत्रालयाच्या सभेत इतरांना अचानक कंठ फुटतो

ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग प्रतिनिधी अकोला दिनांक 22 जुन 2023 :- अकोला जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालया ची ओळख असून ग्राम पातळीवरून निवडून आलेले सदस्य मिनी मंत्रालयाच्या अनेक सभेत ग्रामीण नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हजेरी लावत असतात. मिनी मंत्रालयाच्या सभेत मात्र गटनेता सोडून इतर मोजक्या सदस्यांना कंठ फुटतो आणि आपल्या सर्कलच्या समस्या आणि विकास कामावर ते प्रशासनाच्या डोक्यात आणि डोळ्यात प्रभाव निर्मान करतात. पण इतर मूक कंठ असलेल्या सदस्यांचे काय ? आणि त्यांच्या मत पातळीवरील समाधान समस्यांचे आणि विकास कामांचे काय ? असा प्रश्न प्रत्येक सर्व साधारण सभा, स्थायी समिती ची सभा किंवा विषय समितीची सभेत पडतो.

जिल्हा परिषदेच्या एका विषय समितीच्या सभेनंतर एका सदस्यांची अचानक पणे कंठाने जोर पकडला होता. विषयांच्या सभा सोडून इतर सभा मध्ये ते सर्व साधारण असो की विशेष सभा किंवा स्थायी समितीची सभा इतर सदस्यांना बोलण्याचा आणि प्रश्न मांडण्यासाठी मिळत नाही काहीं फ्रंट लाईनच सर्व निर्णय आणि समस्या मांडून घेण्यात प्रथम असतात तर आमच्या समस्या आणि विकास कामातील अडथळे हे खऱ्या परिस्थिती त आमच्या जवळ असतात अशी कच्ची तक्रार एका सदस्यांच्या बैठकीत समोर आली आहे.

या वर बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्याने नेत्याने येणाऱ्या सर्व साधारण सभेत बैठक व्यवस्था स्वतःची बदलण्याचा निर्णय काही सदस्यांच्या समोर घेतला होता अशी भिती मागील बैठकीची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात फिरत आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp