ANN & GTPL नेटवर्क दिनांक १ जुलै :- बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास प्रवाशी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. त्यात 25 प्रवाशांचा होरपळून करूण अंत झाला. या अपघातातून बचावलेल्या 2 प्रवाशांनी अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याच तोंडून वाचा अपघाताचा थरार…
आम्ही 19 -20 नंबरच्या सीटवर बसलो होतो
आम्ही नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हलच्या बसमध्ये बसलो होतो. रात्री आम्ही जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री 1 च्या सुमारास बस प रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस सिंदखेडराजा जवळच्या पिंपळखुटा गावालगत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकाला धडकली. त्यावेळी बहुतांश प्रवाशी झोपेत होते. त्यावेळी आम्ही 19 व 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. आम्ही वरची काचेची खिडकी फोडली आणि कसेबसे बाहेर पडलो, पीडित प्रवाशांनी सांगितले.
दुभाजकाला धडकल्याने डिझेलची टाकी फुटली
दुभाजकाला धडकल्यामुळे बसची डिझेलची टाकी फुटली होती. तिचा स्फोट झाला. काही वेळातच संपूर्ण बसला आग लागली, अशी माहिती या प्रवाशांनी दिली. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या. त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता, असेही या प्रवाशांनी सांगितले.

33 प्रवाशी प्रवास करत होते
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 33 प्रवाशी होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाले. उर्वरित 8 प्रवाशी कसेबसे बचावले. डिझेल टँक फुटल्यामुळे बसला क्षणार्धात आग लागली. त्यातच दरवाजा खालच्या दिशेने बस उलटल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जिवंत होरपळले. तर काहीजण बसच्या काचा फोडून बाहेर पडले.
या बसमध्ये 2 ड्रायव्हर होते. त्यापैकी 1 झोपला होता. तर दुसरा बस चालवत होता. दोघांपैकी 1 जण बचावला असून, दुसऱ्याचा प्रवाशांसह मृत्यू झाला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे झालेल्या बस अपघाताचे मन सुन्न करणारे दृश्य समोर येत आहे. येथील समुद्धी महामार्गावर बसने प्रथम एका खांबाला धडक दिली. त्यानंतर डिव्हायडरला धडकून बस काही अंतर घासत गेली. त्यामुळे बसच्या डिझेलची टाकी फुटल्याने बसला भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. बसला लागलेली आग एवढी भीषण होती की बसचा जळून पूर्णपणे कोळसा झाला आहे. यादरम्यान बसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे रात्री दीड, दोन वाजेच्या सुमारास होरपळून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.