Weekly Horoscope :- आज २ जुलै ते ०८ जुलै २०२३ चे साप्ताहिक राशिभविष्य, हा आठवडा मेष ते मीन सर्व राशींसाठी आर्थिक आणि करिअर संबंधी हा आठवडा कसा जाईल ते सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी वाचा आठवड्या चे आर्थिक राशीभविष्य.
ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल?, कोणत्या राशीच्या लोकांना नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना तोटा होईल?, कोणत्या राशीच्या लोकांना करिअर संबंधी नवीन संधी मिळतील?, आर्थिक आणि करिअर संबंधी हा दिवस कोणासाठी महत्वाचा ठरेल जाणून घेऊया सर्व प्रश्नाचे उत्तर राशी भविष्या मार्फत
🐏 मेष :- तुमच्यासारख्या सक्षम व्यक्तीची मन:स्थिती सहज अस्वस्थ होत नाही. तुम्हाला नामोहरण करणे सोपे नाही. आठवड्याची ग्रहदशा वाईट नाही, मात्र या आठवड्यात तुमची गाठ एका ताकदीच्या विरोधकाशी होणार आहे. सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्र या ठिकाणी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा अनुभव अधिक येईल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्त्रियांनी मानसिक स्वास्थ्य जपावे. काहीतरी त्रासदायक घडेल अशी भीती मनातून काढा. अप्रिय विषयांवर चर्चा करणे टाळा. सहा आणि आठ तारखेला सावध राहून वादविवाद टाळा.
🦬 वृषभ :- सोयरीकीसाठी प्रवास संभवतो. आनंदाची बातमी मिळेल. आवडती जबाबदारी खांद्यावर येईल. विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मत्सरभाव वाढेल. मतभेद होण्याची शक्यता आहे.ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्राप्त संधीवर लक्ष केंद्रित करा. अंतरात्म्याचा आवाज ऐकून त्याप्रमाणे निर्णय घ्या. सहा, सात किंवा आठ यापैकी एकादिवशी गणेश मंदिरात देवदर्शन घ्यावे. अधिकाधिक योगदान हातातील कामात द्या. विवेक बाळगा. मतभेद टाळा.
👩❤️👨 मिथुन :- अंगभूत कलागुणांद्वारे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. छंदातून व्यवसाय सुरू होईल. छंदाला प्रोत्साहन मिळेल. छोट्या व्यवसायाला मोठी संधी मिळेल. कॉन्ट्रॅक्ट मिळेल. मालमत्तेतून लाभ. बळ वाढेल. रद्द झालेले कॉन्ट्रॅक्ट/संधी पुन्हा तुमच्याकडे येईल. अचानक आलेली जबाबदारी घेणे फायद्याचे ठरेल. सहा आणि आठ तारखेला आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
🦀 कर्क :- विद्यार्थ्यांना ग्रहदशा शुभ आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन पुढे चला. पत्रकारिता, संचालनकार्य, माहिती प्रसारण आणि जाहिरात क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना उल्लेखनीय कार्य करायची संधी मिळेल. आर्थिक दृष्टीने हा आठवडा शुभ आहे. व्यापार उद्योगात नेहमीपेक्षा उलाढाली वाढतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. एखाद्याने तुम्हाला दिलेली त्याची खाजगी माहिती तुमच्याकडून उघड होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही कुणाकडे तुमचे खासगी विषय बोलू नका. मतभेद टाळा. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मातृपितृ सौख्यात अडचणी. पाळीव प्राण्यांना आरोग्याचा त्रास. तीन किंवा चार तारखेला घरात धार्मिक कार्याचे आयोजन करा.
🦁 सिंह :- बुद्धिमत्तेचा प्रभाव पडेल. यशदायी ग्रहदशा. मघा नक्षत्राला आर्थिक लाभ. विशेष खरेदी कराल. बुद्धिमत्तेचा प्रभाव दिसेल. समस्या स्वप्रयत्नाने दूर कराल. वैचारिक क्षमतेने कामे पार पाडाल. गर्भवती स्त्रियांना सहा आणि आठ तारखेला जपावे. वेळेपूर्वी प्रसूती संभवते. गर्भवती स्त्रियांनी आणि वृद्ध व्यक्तींनी या आठवड्यात विश्रांती घ्यावी. मनात उलट सुलट विचारांना थारा देऊ नका. मन आनंदी ठेवा. आवडते पदार्थ बनवून खाल्ल्याने ताण कमी होईल.
👩🏻 कन्या :- नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने गेल्या आठवड्याप्रमाणे हा आठवडासुद्धा शुभदायी आहे. वरिष्ठांवर प्रभाव पडेल. आजवर घेतलेल्या कष्टाचे फळ देणारे ग्रहमान आहे. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. एखादी जबाबदारी तुमच्यावर येईल आणि त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. या आठवड्यात थोडा खर्च वाढेल. प्रिय व्यक्तीची आर्थिक जबाबदारी घेण्याचा प्रसंग येईल. मात्र त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाही. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. नातेवाईक आणि मित्रपरिवारामुळे आर्थिक आणि व्यावसायिक लाभ होईल.
⚖️ तूळ :- वडीलधाऱ्यांची प्रकृती बिघडेल आणि कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावर येईल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी असाच अनुभव येऊ शकेल. अचानक आलेली जबाबदारी तुम्ही नीट पार पाडाल. मात्र घाई गडबडीत किंवा एकांगी निर्णय घेऊ नका. वडीलधाऱ्यांचे वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या मदतीने अडचणी दूर होतील. मूळ गावी प्रवास संभवतो. या आठवड्याची ग्रहदशा गृहिणींसाठी मध्यम आहे. मौल्यवान वस्तू जपा. अनोळखी व्यक्तींवर फार विश्वास ठेवू नका.
🦂 वृश्चिक :- जाता जाता निसटशी तुमच्या राशीत डोकावून जाणारी ही सलग तिसरी पौर्णिमा! गेल्या तीन महिन्यांचा अनुभव पाहता आध्यात्मिक स्तरावर हे महिने प्रभावी राहिलेले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला अस्वस्थता वाढेल. कुणाचीही मदत न घेता स्वतःचे काम स्वतः केले की तुमचा आत्मविश्वास बळावतो. या आठवड्यात तुम्ही तुमच्यातील हाच गुण आठवण्याची गरज पडणार आहे. ठरवलेल्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला कोणाचीही मदत मिळणारी नाही. सहाय्यकांची किंवा वरिष्ठांची ऐनवेळी गैरहजेरी होऊन सर्व जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेवणार आहे. तुम्ही हे सकारत्मकरीत्या घ्या. बाजी तुमचीच असेल.
🏹 धनु :- तुमच्या राशीत होणारी गुरुपौर्णिमा या आठवड्याचे शुभ ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. संततीसाठी विशेष शुभ ठरणारा हा आठवडा तुमच्या संततीच्या अडचणी दूर करेल. मुला बाळांना वेळ द्या. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना हा अनुभव अधिक येईल. घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन करा. गृहिणींसाठी ग्रहदशा शुभ. या आठवड्यात नोकरी बदल स्वीकारू नका. नोकरीच्या ठिकाणी सामंजस्याने वावरा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मिळालेल्या मोलाच्या सल्ल्याचा मान राखा.
🦐 मकर :- आठवडा कौटुंबिक स्तरावर उत्साह वाढवणारा आहे. कुटुंबात आनंद वाढेल. प्रिय पाहुण्यांचे/ जिवलग व्यक्तीचे आगमन घडेल. बराच काळ दूर राहिलेली व्यक्ती घरी परत येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होतील. गृहिणींना ग्रहदशा उत्साही. कुटुंबात आनंद वाढेल. धार्मिक कार्यांचे आयोजन कराल. मतभेदांमधून सुटका होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे काम वाढेल. कायद्याशी आणि न्यायव्यवस्थेची संबंधित व्यक्तींना बदलीचे योग आहेत. नवविवाहित व्यक्तींना जोडीदाराचा तात्पुरता विरह सहन करावा लागेल.
🍯 कुंभ :- शुभ आठवडा असला, तरी तुमची धावपळ वाढवणारा आहे. आनंदाच्या कारणांमुळे दिनचर्येत बदल घडेल. जबाबदारी झेपवल्याने कौतुक होईल. मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. शैक्षणिक बदल सुखकर होती. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. पर्यटन, तीर्थयात्रा यांचे आयोजन ठरेल. धार्मिक कार्यात, कुटुंब आणि मुलाबाळांसोबत रमाल. महत्त्वाची कामे रेंगाळतील; पण चिंता करू नका. सहा आणि सात तारखेला पर्यटन इत्यादी टाळावे
🦈 मीन :- यापूर्वी कष्ट घेतलेल्या कामांमध्ये स्थिरता दिसेल. नियोजन पूर्णत्वास जाऊन व्यावसायिक स्थैर्य मिळेल. पाऊस पाण्याचे दिवस असले, तरी भरभराट करून देणारी ग्रहदशा आहे. त्याचा प्रभाव दिसल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय तुमच्या पदरात पडेल. बढती, कर्ज मंजुरी, कामाचा परतावा आणि अपेक्षित व्यवहार ठरतील. इच्छित कार्याला मंजुरी मिळेल. एखादे विशेष कंत्राट ठरेल. वादांपासून दूर राहा. शेतीवाडी, बागायतीची कामे वेग घेतील. थांबलेले व्यवहार मार्गी लागतील. पुनर्नूतनीकरणासाठी सध्याची ग्रहदशा शुभ आहे. कौटुंबिकदृष्ट्या विवाहितांना उत्तम ग्रहमान.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)