महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प अंतर्गत स्मार्ट कॉटन यामध्ये तेल्हारा तालुक्यातील गोर्धा गावामधे महिला शेतकऱ्यांची कापूस पिकाची शेती शाळा घेण्यात आली.शेती शाळेच्या या पहिल्या वर्गामध्ये उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांना प्रकल्प बद्दल पुन्हा एकदा विस्तृत अशी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रकल्पाचे यशस्वीतेकरता उच्च प्रतीचे कापूस उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीपासून करायचे एकात्मिक पीक नियोजन, कापूस पिकातील पाणी व्यवस्थापन तसेच करावयाची पहिली फवारणी आणि पुढील होणाऱ्या शेती शाळेचे नियोजन याबाबत मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी चर्चा केली.

कापूस पिकातील मित्र किडीची ओळख आणि त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडीवर उपाय म्हणून घरगुती पद्धतीने तयार करता येणारे कीटकनाशके याबाबत प्रात्यक्षिक आधारे कृषी सहाय्यक श्री सुनील राजनकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या महिला शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सुष्म खाद्यान्य योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना याबाबत चर्चा ही कृषी सहाय्यक मनोज कुमार सारभुकन यांनी घडवून आणली.
या शेती शाळेमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन शेतीमध्ये त्यांचे असलेले अनुभव कथन केले. या शेतीशाळेचे सूत्रसंचालन गावचे कृषी सहाय्यक श्री महेश इंगळे यांनी केले तर यावेळी या शेती शाळेला कृषी पर्यवेक्षक जी डी नागे कृषी सहाय्यक पी डब्ल्यू पेठे, विठ्ठल बिहाडे एस.पी राजनकर यांच्यासह बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. शेती शाळेमध्ये महिलांना प्रशिक्षण साहित्य आणि शेतीशाळेनंतर अल्पो आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
