ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला दि.9 – किडनी स्टोन एक गंभीर आणि भयंकर वेदना देणारी समस्या आहे. ही समस्या कुणालाही होऊ शकते. असं मानलं जातं की, महिलांच्या तुलनेत पुरूषांना ही समस्या अधिक होते. सामान्यपणे दहापैकी एका व्यक्तीला त्याच्या जीवनात किडनी स्टोनची समस्या होतेच. किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत जसे की, पाणी कमी पिणे, मांस अधिक खाणे, यूरिक अॅसिड वाढणे, लठ्ठपणा, डायबिटीस इत्यादी. किडनी स्टोन काढण्यासाठी अनेक औषधं आणि उपाय आहेत. पण काही घरगुती उपायांच्या माध्यमातूनही तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. डॉक्टर विनोद शर्मा यांनी असाच एक उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे सात दिवसात किडनी स्टोन बाहेर निघतात.
किडनी स्टोनची लक्षण
किडनी स्टोनचं सगळ्या मोठं लक्षण म्हणजे पाठीच्या खालच्या भागात गंभीर वेदना. त्याशिवाय काही लक्षण खालीलप्रमाणे आहेत. ज्यात पोटदुखी, ताप, लघवीतून रक्त येणे, लघवीतून दुर्गंधी येणे, उलटी किंवा मळमळ यांचा समावेश आहे.
किडनी स्टोनचा घरगुती उपाय
किडनीमधील स्टोनचा आकार वेगवेगळा असतो. असं मानलं जातं की, छोट्या आकाराचे स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतात. अनेकदा मोठे स्टोन निघत नाहीत, ते नष्ट करण्यासाठी औषधं आणि सर्जरीची वेळ येऊ शकते. काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन बाहेर काढता येतात.
डॉक्टरांनी आपल्या एका पोस्टमध्ये सांगितलं की, किडनीमधील स्टोन बाहेर काढण्यासाठी जास्वंदाचं फूल एक चांगला आणि सुरक्षित उपाय आहे. या फुलाचं पावडर करून पाण्यासोबत सेवन केल्यास किडनी स्टोन बाहेर काढता येऊ शकतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, रात्री जेवण केल्यावर एक किंवा दीड तासाने एक चमचा जास्वंदाच्या फुलाचं पावडर कोमट पाण्यासोबत प्या. हे पाणी प्यायल्यानंतर तीन तास काहीच खाऊ नका. ही पावडर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानावर सहज मिळेल.
काय काळजी घ्याल?
जर तुम्हाला जास्त ताप असेल, असह्य वेदना होत असेल, तुम्हाला थरथरी सुटत असेल, लघवीतून रक्त येत असेल अशा स्थितीत तुम्ही कोणत्याही घरगुती उपायावर अवलंबून राहू नका. या स्थितीत लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.