अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 20 जुलै – भारतीय हवामान विभागच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 19 ते 25 जुलै दरम्यान आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 19, 20, 21, 22 व 23 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. तर 24 व 25 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो पिक निहाय कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.
कपाशी
पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक
सोडियम 10% ईसी 12.5 मिली ते 15 मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन
नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल 5% ईसी 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी.
सोयाबीन
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन पेरणी राहिली असल्यास, त्यांनी सोयाबीन पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सेंमी पर्यंत कमी करून तसेच बियाणे दर हा प्रती हेक्टरी 90 ते 100 किलो बियाणे पर्यंत वाढवून पेरणी हि ह्या आठवड्या अखेर करावी. उशिरा सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांनी कमी कालावधीच्या जेएस-20-34, एनआरसी 130, एनआरसी 131, एनआरसी 138 या सारख्या सोयाबीन वाणांच्या लागवडीस प्राधान्य द्या.
भात
धान पिकाचे रोपे / पर्हे २१ ते २५ दिवसांचे झाले असल्यास रोवणी करावी. मित्र किडींच्या डीं संवर्धनासाठी धान बांधावर झेंडू व चवळी पिकाची लागवड करावी.
रोपवाटीका: खोडकिडा व गादमाशीच्या व्यवस्थापनाकरिता कार्बोफ्युरॉन 3% दानेदार 25 किलो ग्रॅम प्रति हेक्टर (कार्बोफ्युरॉन 3% दानेदार 250 ग्रॅम प्रति 100 वर्ग मीटर रोपवाटीका) रोपकाढणीच्या 5 दिवस अगोदर रोपवाटीकेत टाकावे. धान रोपवाटीका तण विरहीत ठेवावी.
तूर
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
मुग
मुग पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
उडीद
उडीद पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
