अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-स्थानिक श्री नरसिंग कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि तहसिल कार्यालय आकोट यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह अंतर्गत, महसूल विभागाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्याकरिता “युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबीता हजारे, मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.सुनील चव्हाण, तहसीलदार, आकोट विजय सवडे ,अप्पर तहसीलदार आकोट, निळकंठ नेमाडे ,मंडळ अधिकारी , मोहोकार साहेब , संतोषी वानखडे मॅडम, शैलेश मेतकर साहेब ,डॉ. अनिल बाभुळकर, संजय तळोकार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कु.अर्चना वरठे यांच्या सविंधान शपथेच्या वाचनानी झाली.प्रमुख अतिथिंचे स्वागत ग्रंथभेट देऊन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शन करत असताना डॉ सुनील चव्हाण यांनी महसूल प्रशासनाच्या कामकाजा संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती देत उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसे प्रयत्न करावे याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले, विजय सवडे साहेब यांनी क्यू आर कोड या माध्यमातून महसूल प्रशासनाच्या अनेक बाबी कशा सोयीने प्रत्येकाला हाताळता येतील याबाबत माहिती देत स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना कशी तयारी करावी याबाबत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले
नीलकंठ नेमाडे साहेब, दिनेश मोहोकार साहेब ,सिद्धांत वानखडे यांनी महत्त्वपूर्ण महसूल प्रशासनाचा संबंधित अनेक बाबींचा सोप्या पद्धतीने परिचय विद्यार्थ्यांना दिला व नविन मतदार नोंदणी युवकांनी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून डॉ. हजारे यांनी महसूल विभागाच्या या सोयींचा सर्वांनी फायदा घेत विद्यार्थ्यांनी स्वयंनिर्भर बनवण्याचे आव्हान केले . या कार्यक्रमात जातीच्या दाखल्यांचे वाटपही करण्यात आले तसेच क्यु आर कोडच्या प्रतिंचे वाटपही करण्यात आले.कार्यक्रमाला सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. बाभुळकर यांनी केले तर आभार कु. गायत्री भटकर यांनी मानले कार्यक्रमाला डॉ.कैलास कराळे प्रा.प्रकाश आवंडकर,प्रा.भेलोंडे मॅडम ,प्रा.राठोड सर, जीनेश फुरसुले , सोनू नेरकर ,माधुरी अनासने ,राहुल तळोकार ,पंकज येवले तसेच महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद तथा विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.