अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २४ ऑगस्ट २०२३:-दहावी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईट म्हटले जाते यानंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे यासंदर्भातील निर्णय विद्यार्थी घेतात. आता दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात काही बदल मंत्रालयाने केले आहे. हा बदल करुनच आता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात पुस्तके येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा हा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीकडून हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे.
काय आहे बदल
दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष २०२४२५ साठी करण्यात येत आहे. त्यानंतर ही पाठ्यपुस्तके येणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला जात आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे(AKOLA NEWS NETWORK)