अकोला न्युज नेटवर्क दिनांक २२ जुलै :- अकोला शहरात भर पावसात एका हॉटेल माधव आग लागल्याची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली असून लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाने त्वरित ताबा मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला
काल रात्री पासून अकोला शहरात मुसळधार पाऊस सुरु असताना अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील शिव शक्ती उपहार गृहातून धुर निघत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांना दिसून आले या उपहार गृहास आग लागली असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचे शटर उघडताच धुराचे लोट च्या लोट बाहेर येत असल्याने आत जाण्यास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देखील मुश्किल होत होती अखेर जीवाची परवा न करता स्थानिक नागरिकांच्या मदतीने या उपहार गृहाचे दुसरे शटर तोडून अग्निशमन दलाचे कर्माचारी आत शिरले व त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले मौजी लव्वा पटेल यांच्या मालकीच्या या उपहार गृहात तेलाचा दिवा लावला असल्याने ही आग लागली असून उपहार गृहात सर्वत्र तेल असल्याने धुराचे लोट निर्माण झाले होते वरतून पाऊस सुरु आणी ही आग विझवण्या साठी अग्निशमन दलाच्या करमार्चाऱ्यांनी पाणी मारण्यास सुरवात केल्याने भर पावसात लागली आग अशी चर्चा सर्वत्र सुरु होती