Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीमुख्याध्यापक श्री रविंद्र कापसे यांना सेवा निवृत्ती निमित्य शाळा व्यवस्थापन समिती ग्राम...

मुख्याध्यापक श्री रविंद्र कापसे यांना सेवा निवृत्ती निमित्य शाळा व्यवस्थापन समिती ग्राम पंचायत पदाधिकारी परिसरातील नागरीक शिक्षक व चिमुकले विद्यार्थी यांचेकडून भावपूर्ण निरोप

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-श्री रविंद्र शंकरराव कापसे हे नियत वयोमानानुसार वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यामूळे सेवानिवृत्त झाले व त्या निमित्य त्यांना सहृदय भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी त्यांचे सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निताताई रविंद्र कापसे, चिरंजिव इंजि. रितेश, सौ. श्वेता रितेश कापसे हा सरांचा परिवार उपस्थित होता.त्यांची सुरुवात जि. प. प्राथ. शाळा भडशिवणी, पं.स.कारंजा येथे शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर १९९५ साली पदविधर शिक्षक म्हणून जि. प शाळा मरोडा येथे १४ वर्ष सेवा केली. तसेच जळगाव नहाटे येथे पुन्हा १४ वर्ष सेवा करून दोन्ही शाळेस नावलौकीक प्राप्त करवून दिला व त्यानंतर जि.प आदर्श शाळा बोर्डी येथे १ वर्ष उच्च श्रेणी मुअ म्हणून कार्य केले. या दरम्यान अलौकीक असे कार्य करून सेवानिवृत झाले. निरोप समारंभाच्या सुरुवातीला शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते/करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अतिथीचे स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे/प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक प्रभाकर नागरे यांनी केले व या प्रास्ताविकात श्री .रविंद्र कापसे सरांच्या संपूर्ण कार्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सुभाषजी खिरकर यांनी सर्वप्रथम श्री. रविद्र कापसे सरांचा शाल व श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार केला. ग्रा.प बोर्डी च्या वतीने श्री समाधान चंदन यांनी शाल श्रीफळाने सपत्नीक सत्कार केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ सविता गणेश सोनोने व त्यांच्या परिवाराच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . श्री गजाननराव खिरकर, शाव्यस सदस्या शारदाताई भलावी , काशिरामजी सोनोने , काझी अतिक सर , अब्दुल अजिज सर बोर्डी यांनी याप्रसंगी सत्कार केला . बोर्डी केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे वतीने तसेच जि.प व प्राथ मराठी शाळेच्या वतीने मुअ श्री कापसे सर व परिवाराचा शाल, श्रीफळ साडी चोळी व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेतील श्री पिंटूभाऊ राजगुरु यांनी सहपरिवार सरांच्या संपूर्ण परिवाराचा सत्कार सोहळा संपूर्ण अहेर करून पार पाडला. केंद्रातील इतरही शिक्षकानी हार-तुरे शाली या मार्फत आपल्या भावना व्यक्त करून स्वागत केले. ह्या सर्व सोहळ्या दरम्यान संपूर्ण सभागृहात भावनिक व गंभीर वातावरण निर्माण झालेले होते. सत्काराच्या या सोहळ्यानंतर सर्वानी आपल्या सदिच्छा व भावना व्यक्त केल्यात

शाळेच्या माजी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी सुद्धा शाळेत येऊन कापसे सरांचे स्वागत केले या प्रसंगी श्री सुभाषराव खिरकर श्री. राजेंद्र थारकर, के . प्र संजय साळुंके, श्री राजेश कुलट, श्री अनिल गोंडचर, श्री प्रशांत धाबे, श्री सुधाकर पिंजरकर, श्री. निवृत्ती राउत, कु घुमारे मॅडम, श्री ज्ञानेश्वर खापरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आपले मनोगत व्यक्त करतांना सौ निताताई कापसे अनेक प्रसंगी भावूक झाल्यात. सत्काराला उत्तर देताना श्री रविंद्र कापसे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सर्वाचे आभार व्यक्त करून यापुढेही शाळा विद्यार्थी यासाठी कार्य सुरु ठेवण्याच्या निर्धार केला. जि.प शाळेत त्यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या “पुस्तकांची शाळा” या उपक्रमाला त्यांनी २१,००० रूची देणगी जाहीर केली. या प्रसंगी त्यांचे उच्च विद्याविभुषीत चिरंजीव इंजि.दरम्यान पहिल्या सत्रात उपसरपंच राजेश भालतिलक जि.प.सदस्य श्री प्रकाश आतकड, रमेश खिरकर,पत्रकार श्री नरेंद्र कोंडे देवानंद खीरकर यांनी शाल श्रीफळ देऊन श्री कापसे सरांचा सत्कार केला व त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.या कार्यक्रमाचे संचलन उमेश चोरे यांनी तर आभार श्री अजय अस्वार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु मनोरमाताई बुंदिले, कु रुपाली साबळे / सिरस्कार, कु रचना शर्मा,कु मायाताई लायबर,श्री आनंद नांदुरकर श्री शिवदास आढे तथा शाळा व्यवस्थापन समिती,सर्व अंगणवाडी ताई,गावकरी मंडळी उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!