Thursday, May 23, 2024
Homeब्रेकिंगट्रक व दुचाकीचा अपघातात एक गंभीर अकोला-वाशिम रोडवरील घटना

ट्रक व दुचाकीचा अपघातात एक गंभीर अकोला-वाशिम रोडवरील घटना

ANN & GTPL न्यूज नेटवर्क, अकोला प्रतिनिधी स्वप्निल सुरवाडे दि.9/6/2023 पातूर : अकोला ते वाशिम रोडस्थित असलेल्या तहसील कार्यालयासमोर ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पातूर पासून वाशिमकडे जाताना पातूर तहसील कार्यालयासमोर आज दि.09/06/2023 रोजी रात्री सुमारे 7 : 30 वाजताच्या दरम्यान ट्रक व दुचाकीचा अपघात झाला असून सदर अपघाताची माहिती पातूर उपस्थित प्रत्यक्षदर्शीनी पातूर पोलिसांना दिली, संबंधित माहितीवरून पातूर पोलीस यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.

सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की,वाशिम ते अकोला रोडवर असलेल्या पातूर तहसील कार्यालयासमोर समोर दुचाकी क्र.- एम.एच. 30 ए.पी. 3316 व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र.- एम. एच.40. सी.डी. 0156 या वाहनाने धडक दिली,असून दुचाकीस्वार गजानन सुभाष गीते (वय 38) रा.पास्टूल ता.पातूर हा गंभीर जखमी झाला आहे.यावेळी पत्रकार दुले खान,निशांत गवई,परशराम देवकर,गीते मेजर,गणेश घुगे, यांनी 108 रुग्णवाहिकेच्या चालक सचिन बारोकार,डॉ.फैजान जहागीरदार यांच्या मदतीने जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक कर्मचारी गेडाम मेजर व पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांनी दुचाकीच्या अपघातास कारणीभूत असलेल्या घटनास्थळावरून पळ काढलेल्या ट्रकला पकडून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. सदर प्रकरणी पातूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!