Saturday, April 13, 2024
Homeताज्या घडामोडीभिषण अपघात | सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला १२...

भिषण अपघात | सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला १२ भाविकांचा मृत्यू

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ : (सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला १२ भाविक ठार) छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या मृत व्यक्तींमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीचा ही समावेश आहे.

ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. मात्र, छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका परिसरातील समृद्धी महामार्गावर त्यांच्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला.

या अपघाता 23 जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणाला गेले होते आणि येथून परतत असताना हा अपघात झाला आहे. हा अपघता वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली.

या घटनेची माहिती मिळात पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातातील जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 30 प्रवासी होते. हे सर्व जण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाच्या दर्शन करून नाशिकला परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

स्थानिकांनी केली मदत

वैजापूर तालुक्यातील जांबरगवा टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावताील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातातील जखमी झालेल्या सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या घटनास्थळी समृद्ध महामार्गावरील बचाव पथक वैजापूर पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!