अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीच असते पर्यटकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणी वळतात. मात्र पर्यटनस्थळी बेशिस्त पर्यटकांचीही कमी नसते. अशा हुल्लडबाजांमुळे पर्यटनस्थळी अनेकदा असुरक्षिततेची भावना इतर पर्यटकांना होते. सातपुड्यातील पोपटखेड जंगलात अशा हुल्लरबाजांना वन विभागाच्या सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

पावसाळ्यात सातपुड्यातील नद्या दुधड्या भरून वाहत आहेत काही ठिकाणी नदी मध्ये खोल आहेत असून यात कित्येक पर्यटक बुडून मृत्यू झालेले आहेत. पर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या अश्या टवाळखोरांना वनविभागाकडून चांगलाच चोप दिला आहे. पोपटखेड येथील वन विभागाच्या चेकपोस्ट वर काही पर्यटक गोंधळ घालत होते त्यांना वनमजुराने गेटपास घेण्याचे सांगितले असता त्यांनी अरेरावी करून त्यांची कार गेट जवळ उभी करून ते पायी जंगलात गेले पर्यटक यांनी मद्यसेवन केलेले होते व सोबत दारूच्या बाटल्या व जेवणाचे डबे सोबत घेऊन गेट च्या 4 ते 5 की.मी.आत जाऊन पर्यटक याठिकाणी मद्यसेवनही करत होते अशी माहिती वनविभागातील उच्च अधिकारीना मिळाली त्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि पर्यटकांना सुरु असलेल्या गैरप्रकारवरुन त्या पर्यटकांना चांगलाच धडा शिकवला असून त्यांच्यावर जंगल नियमांचे उलघंन केल्या बद्दल पुढील कार्यवाही करण्यात आली. सातपुडा पर्वत निसर्ग प्रेमींना खुणावतोय अश्यात जंगलात फिरायला येणाऱ्या इतर पर्यटकांना अश्या पर्यटकांचा त्रास होतो. वनविभागा मार्फत दिलेल्या सूचना चे उल्लघन केल्यास अश्या पर्यटकावर योग्य ते कार्यवाही केल्या जाईल अस वनविभागा कडून जाहीर आवाहन करण्यात आले. आकाश तायडे ANN NEWS पोपटखेड


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!