अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २२ ऑगस्ट २०२३:-जंगलाच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्यांवरुन प्रवास करणं जेवढं निसर्गरम्य वाटतं तेवढंच ते धोकादायकही असतं. कारण कधी कोणता प्राणी गाडी समोर येईल, हल्ला करेल काही सांगता येत नाही. जंगलातून जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर अपघाताच्या, प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे जंगलातील रस्त्यांवरुन जाताना खबरदारी घेण्याचं सांगितलं जातं. एक घटना समोर आलीय ज्यामध्ये जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीवर हत्तीनं हल्ला केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.जाहिरातव्हिडिओमध्ये एका व्यक्तीची बाईक रस्त्यावर पडल्याचं तुम्ही पाहू शकता.
दुचाकीस्वार गाडीला उचलण्याचा प्रयत्न करत असताना जवळच असलेल्या कारचा हॉर्न वाजतो. जंगलातून हत्ती येऊन संतापात बाईक स्वारावर हल्ला करतो. हत्ती बाईक ढकलून देतो. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाईक घेऊन ट्रकला धडकली व्यक्ती, काही क्षणात घडलं असं की annnewsnetwork नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर फिरताना दिसला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत.जाहिरातदरम्यान, हत्तीच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीही अनेक असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जंगलात जाऊन काही विचित्र कृत्य करुन पर्यटक प्राण्यांना त्रास देतात मग प्राणी भडकताच त्यांच्यावर हल्ला करतात. कधी पर्यटकांची चुकी असते तर कधी चुकी नसतानाही त्यांच्यावर हल्ला केला जातो.