Wednesday, October 9, 2024
Homeक्राईमACB Trap in Akola Dist अकोट शहरात एसीबीचा धाडसी कारवाई, लाचेची रक्कम...

ACB Trap in Akola Dist अकोट शहरात एसीबीचा धाडसी कारवाई, लाचेची रक्कम घेऊन फरार झाला एपीआय!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ६ एप्रिल :- ACB Trap in Akola Dist अकोट शहरातील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) राहुल देवकर यांनी आज लाचेची रक्कम घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एसीबीच्या सापळ्यात अडकूनही देवकर यांनी फिर्यादीकडून स्वीकारलेली लाचेची रक्कम आणि खाजगी वाहन वापरून पळ काढला आहे.

लाचेची मागणी आणि फरार: ACB Trap in Akola Dist गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या एका प्रकरणात तपास करत असलेल्या देवकर यांनी आरोपीला चार्जशीटमध्ये कमी जास्त करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. जास्त रक्कम मागितल्याने फिर्यादीने अमरावती एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने आज सापळा ACB Trap in Akola Dist रचून देवकर यांना रंगेहात पकडले. पंचांसमक्ष एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या कारवाईची शंका आल्याने देवकर यांनी लाल रंगाच्या ब्रिझा कारने पोलीस स्टेशनमधून पळ काढला.

ACB Trap in Akola Dist लाचेची मागणी आणि फरार: गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या एका प्रकरणात तपास करत असलेल्या देवकर यांनी आरोपीला चार्जशीटमध्ये कमी जास्त करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. जास्त रक्कम मागितल्याने फिर्यादीने अमरावती एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने आज सापळा रचून देवकर यांना रंगेहात पकडले. पंचांसमक्ष एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या कारवाईची शंका आल्याने देवकर यांनी लाल रंगाच्या ब्रिझा कारने पोलीस स्टेशनमधून पळ काढला.

पाठलाग आणि गुन्हा दाखल: एसीबीच्या अधिकाऱ्यांनी देवकर यांचा पाठलाग केला, परंतु ते हाती लागले नाहीत. त्यांच्यावर लाचखोरी प्रतिबंधक कायदा आणि सीआरपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची तयारी एसीबीने सुरू केली आहे.

पोलिस दलात खळबळ: या घटनेमुळे अकोला पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने लाचेची रक्कम घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्येही पोलीस दलाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

पुढील तपास: एसीबी आता देवकर यांचा शोध घेत आहे. तसेच, त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवरही कारवाई करण्याची शक्यता आहे. हे प्रकरण न्यायालयात कसे सुटते आणि त्याला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.05:02 PM

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp