अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४:- अकोला जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशन हद्दीमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बस, ऑटोरिक्षा व तत्सम वाहने यांचेवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतुक विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमे दरम्यान ३३४ वाहनांविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ कलमाखाली कारवाई करुन ३३ लाख ४० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहन धारकाने परवान्यातील शर्ती व अटी यांचे पालन करावे त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येवून वाहन निलंबनाचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविल्या जाईल. असे शहर वाहतुक विभागाकडून कळविण्यात आले आहे. वाहनावर अगोदरचा दंड प्रलंबित असल्यास तात्काळ वाहतुक नियंत्रण विभाग यांच्याकडे भरणा करावा. वाहन चालवितांना वाहनाची कागदपत्रे जसे परवाना, आरसी बुक, इन्शोरन्स ही कागदपत्रे सोबत ठेवावी असे आवाहन शहर वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलिस निरिक्षक सुनिल किनगे यांनी केले आहे.