अकोला न्यूज नेटवर्क अब्दुल साकीब प्रतिनिधी हिवरखेड दिनांक २४ सप्टेंबर २०२३ :-हिवरखेड शहरातील आठवडी बाजार व जिल्हा परिषद उर्दू शाळा रोडवर शाळकरी विद्यार्थी व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.या रस्त्यावरील पातुरकर हॉस्पिटलच्या बाजूला विजेचा खांब रस्त्यावर पूर्णपणे झुकला आहे. याशिवाय अमीरखान तमीज खान यांच्या घरासमोरील आणखी एक विद्युत खांब पूर्णपणे जीर्ण होऊन नष्ट झाला आहे.
तसेच हे पोळ या रस्त्यावर जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडी बाजार असून या खांबाखालून नागरिक, शाळेचे विद्यार्थी, लहान मुले, वृद्ध यांची नेहमीच येना -जाना असते. तसेच हे दोन्ही विद्युत खांब कधीही पडू शकतात व त्यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते. हे दोन विद्युत खांब अत्यंत धोकादायक बनले आहेत.
त्यामुळे हे दोन्ही विद्युत खांब लवकरात लवकर बदलून नवीन विद्युत खांब बसवावेत, तरी मा. महोदय, ही नम्र विनंती आहे की हे दोन्ही विद्युत खांब लवकरात लवकर बदलण्यात यावेत अन्यथा कोणत्याही अपघातास आमचे वीज वितरण कार्यालय जबाबदार राहील. तसेच हे दोन विद्युत खांब आठ दिवसांत बदलून दुसरे नवीन विद्युत खांब न लावल्यास संकुलातील नागरिक आंदोलन करतील, असे शाहरुख खान व अब्दुल साकीब पत्रकार यांनी निवेदन देताना स्पष्ट केले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महावितरणने तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही खांबांची पाहणी करून त्या जागी नवीन खांब बसवले.