अकोला न्यूज नेटवर्क अब्दुल साकिब प्रतिनिधी हिवरखेड दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ :-हिवरखेड शहर येथील नवदुर्गा उत्सव निमित्त हिवरखेड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीच्या आयोजन करण्यात आला होता या शांतता समितीत एस डी पिओ रितू खोकर यांनी आपली उपस्थिती दर्ज केली हिवरखेडचे ठाणेदार गोविंदा पांडव सर यांनी नवदुर्ग सन उत्सव निमित्त सर्व मंडलचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व समितीचे सदस्यांनी शांततेने आपले मिरवणूक काढण्यात यावे समितीचे बैठक मध्ये सागितले यानंतर हिवरखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश दोतोंदे यांनी सांगितले की हिवरखेड येथे हिंदू मुस्लिम मध्ये एकता वर्षा वर्ष पासून आहे काई दिवस पूर्वी गणेश विसर्जनात ते कही झाला आम्ही त्याची निंदा करतो बाहेरगाव येऊन कोणी व्यक्ती अशी हरकत करतो की हिंदू मुस्लिम एकतावर प्रश्न उठतात आम्ही हिंदू मुस्लिम एक आहोत असा स्पष्ट केला
डॉक्टर प्रशांत इंगळे यांनीही समितीत आपले विचार व्यक्त केले की रस्त्यावर मिरवणूक निघते त्या रस्ता छोटा आहे रस्त्यावर मोटरसायकलची आणि हात गाडीची गर्दी होते यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणी जमीर खान पठाण यांनी बैठकामध्ये सांगितले की गणपती मिरवणूक मध्ये जय एअर फटाके चा उपयोग केला आणि फटाके चा कचरा मस्जिद मध्ये गेला यावरआपली नाराजगी व्यक्ति केली
या सर्वांच्या प्रवचन झाल्यावर आयपीएस रितू खोकर यांनी लेडी सिंघम स्टाईल मध्ये स्पष्टपणे सांगितले की तुम्ही शांतता समितीमध्ये एकताचा पाठ पडतो आणि बहार एकमेकांच्या विरोध करतो गणपती विसर्जन मध्ये ते काही प्रकरण झाला मुस्लिम समाजाचे लोकांनी मंडल विरुद्ध निवेदन दिला या सर्व गोष्टीनी वातावरण गरम झालाचि स्थिती होती या नवदुर्गा उत्सवत असा काही चालणार नाही या दुर्गा विसर्जन मध्ये कोणी गलती केल्यास ते हिंदू असो या मुस्लिम असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आणि SDPO यांना सांगितले की मिरवणूक मध्ये सर्व मंडळ धार्मिक गानेच्या अलावा कोणत्याही गेर प्रकार गाना वाजला तर त्या मंडळ वर कायदेशीर कारवाई होणार SDPO रितू खोकर यांनी स्पष्टपणे शांतता समितीत बोलले की चुकीला माफी मिळणार नाही या बैठकीला एस डी पी ओ रितू खोकर,हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सर्व पोलीस कर्मचारी, हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील ,नवदुर्गा मंडळाचे सर्व अध्यक्ष व शांतता समितीचे अध्यक्ष व सदस्य सहीत पत्रकार उपस्थित होते.