Sunday, February 25, 2024
Homeकृषीकापसाच्या उभ्या पिकात कोणते तणनाशक फवारावे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती,

कापसाच्या उभ्या पिकात कोणते तणनाशक फवारावे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती,

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 18 जुलै – कापूस पिकाची लागवड केल्यानंतर जास्त प्रमाणात तणांची उगवण होत असते. कापूस पिकातील दोन ओळीत अंतर अधिक असल्यामुळे कापूस पिकात तण जास्त प्रमाणात होते. इतर पिकाच्या तुलनेत कापसाच्या पिकामध्ये जास्त तणांचा प्रादुर्भाव असतो. कापूस पिक छोटे असल्याने मोठ्या प्रमाणात तण उगवते. ह्या तणावरती 100% नियंत्रण कसे मिळवायचे ते आपण या लेखा मध्ये जाणून घेऊयात हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून ही संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल.

जाणकार लोक सांगतात की, कापूस पीक लागवड केल्यानंतर जवळपास 60 दिवस कापूस पीक तण विरहित ठेवले पाहिजे. पिकात तण वाढल्यास पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य पोहोचत नाहीत. पोषक घटक योग्य प्रमाणात पिकाला मिळत नसल्याने पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादनात घट होते. यामुळे आज आपण उभ्या कापूस पिकात नियंत्रण करण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कापसाच्या उभ्या पिकात कोणत्या तण नाशकाची फवारणी करावी? कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कापूस पीक 20 ते 30 दिवसाचे झाल्यानंतर बायर घासा 500 मिली – पायरिथिओबॅक सोडियम 6% + क्विझालोफॉप इथाइल 4% हे तणनाशक 15 एमएल 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारले तर चांगला रिझल्ट मिळतो. किंवा शेतकरी बांधव कापूस पीक 25 दिवसाचे झाल्यानंतर पायरिथिओबॅक सोडियम 10% EC हे तणनाशक 15 एमएल पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारू शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!