अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २६ जुलै २०२३ -Agriculture News : सध्या खरीप हंगाम सुरु आहे. चांगला पाऊस (Rain) झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, या काळात शेतकऱ्यांना (Farmers) विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाकडून (WhatsApp number) (Department of Agriculture) व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

बियाणे, खते आणि कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सरकारकडून तत्काळ व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नाेंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले.

तक्रार निवारण कक्षाची स्थापना

बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ट दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी ANN न्युज नेटवावर्क वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट ANN News Network नेटवर्क वर.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!