अकोला न्युज नेटवर्क दिनांक ७ मार्च २०२४ :- भारताला पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शाळा मिळाली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील शाळेत एआय शिक्षिका आयरिसच्या आगमनाने शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडून आला आहे. MakerLabs Edutech या कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या या AI शिक्षकाचे नाव आयरिस (Iris) असे आहे. संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे मानले जाते. कडुवायिल थंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने केटीसीटी उच्च माध्यमिक विद्यालयात या नव्या उपक्रमाचा वापर करण्यात आला. आयरिस हे अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पाचा एक भाग आहे. जो 2021 च्या नीती आयोगाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम मानला जातो. याची रचना शाळांमध्ये अतिरिक्त क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली आहे.
मेकरलॅब्सने इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक AI शिक्षक दिसत आहे. ज्यांना अनेक भाषा अवगत आहेत. आयरिस विविध विषयांतील जटिल प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. ज्याचा फायदा मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी होणार आहे.
Makerlabs Edutech कंपनीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आयरिस AI शिक्षकाविषयी नव उपक्रमात आघाडीवर असल्याने कंपनीला नवीन निर्मिती ‘Iris – Al शिक्षक रोबोट’ सादर करताना अभिमान वाटतो. जी शिकण्याच्या पद्धतीला नव्या पद्धतीने शिकविण्यासाठी सज्ज आहे. आयरिस सारख्या भविष्यात आणखी महत्त्वपूर्ण नव कल्पना आम्ही आणणार आहोत असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Iris हे रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह AI चे संयोजन आहे. या रोबोटमध्ये इंटेल प्रोसेसर आणि एक को-प्रोसेसर आहे. ज्यामुळे विविध प्रकारच्या कमांडस हाताळत येणार आहेत. त्या कमांडद्वारे रोबोट सर्व काम करेल. आयरीसला चाके लावण्यात आली आहेत ज्यामुळे ती माणसासारखी हालचाल करू शकेल. आयरिसला तीन भाषांमध्ये बोलू शकते आणि कठीण प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते.