आयपीएल क्रिकेट Akola Betting Crime स्पर्धेवरील अवैध सट्टेबाजीला आळा बसवण्यासाठी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेल्हारा शहरातील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण १,८४,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ एप्रिल रोजी सायंकाळी अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेल्हारा शहरातील टॉवर चौकातील कैलास हॉटेलवर धाड टाकली. Akola Betting Crime गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. सध्या चालू असलेल्या आयपीएल मॅचवर अवैध पद्धतीने सट्टेबाजी होत असल्याची माहिती मिळाली होती.
छाप्यादरम्यान सोनू शिवदास जिंदे (२९, शेतकरी) हा सट्टेबाजी करताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याजवळून दोन मोबाईल, एक लॅपटॉप आणि १६२० रुपये रोख मिळाले आहेत. तसेच हरीओम शिवशंकर अवचार याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ४०,००० रुपये आहे. दिनेश ओमप्रकाश छांगाणी याच्याकडूनही १७,००० रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान तुषार शर्मा याच्याकडून २०,००० रुपयांचा तर निखिल ठाकरे याच्याकडून १५,००० आणि बबलू ठाकरे याच्याकडून १६,००० रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण १,८४,६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही सर्व कारवाई सोनू जिंदे या मुख्य आरोपीविरुद्ध करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार जिंदे हा तेल्हाऱ्यातील कैलास हॉटेलमध्ये Akola Betting Crime आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यावर विविध लोकांना आयडी देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन सट्टेबाजी करत होता. व्हॉट्सअॅपद्वारे सट्टेबाजीचे सल्लेही दिले जात होते. फोनपेद्वारे पैशांची देवाणघेवाण केली जात होती.
या प्रकरणी पोलिस स्टेशन तेल्हारा येथे अपराध क्रमांक Akola Betting Crime ९२/२०२४ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू जिंदे, संकेत शेळके, दिनेश छांगाणी, हरीओम अवचार, निखिल ठाकरे, तुषार शर्मा आणि बबलू ठाकरे अशा सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहीमेत अकोट उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल यांच्यासह पोलिस हवालदार अनिल शिरसाट, पोलिस कॉन्सटेबल आशिष साबळे, किरण अटाळकर आणि मपोकॉ दिपा घिटरे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Akola Betting Crime अवैध सट्टेबाजीवर कठोर कारवाई करण्यासाठी अकोला पोलिसांकडून अशा मोहिमा वारंवार राबवल्या जात आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी असे छापे टाकण्यात येत आहेत. इतर ठिकाणीही अवैध सट्टेबाजी होत असेल तर त्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.