Friday, May 3, 2024
Homeक्राईमAkola Crime अकोला शहरातील ५ गुंड प्रवृत्तीचे आरोपी ६ महिन्यासाठी हद्दपार

Akola Crime अकोला शहरातील ५ गुंड प्रवृत्तीचे आरोपी ६ महिन्यासाठी हद्दपार

अकोला न्यूज नेटवर्क :- निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यातच अधिकारी पोलीस वर्ग यांच्या बदल्यांचे आदेश देखील येवून धडकले आपला अकोला जिल्हा संवेदनशील म्हणून गणल्या जातो आता जरी अकोला (Akola Crime) जील्ह्यात शंताता असली तरी काही गुंड प्रवृत्तीचे लोकं जिल्ह्यात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी जिल्हा शांत कसा राहील, याची जबाबदारी प्रशासनावर असते.

ही शांतता आबादित ठेवण्यासाठी प्रशासनाला (Administration) महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने (District Police Department) जिल्ह्यातील तब्बल ५ सराईत गुन्हेगारांना अकोला व बाळापूर तालुक्यातून ६ महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश आज पारित करण्यात आले.

अकोला शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणा-या गुन्हेगारीच्या इसमांवर कायदा धाक रहावा. याकरीता पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधत्मक उपयोजना म्हणुन अकोला शहरातील

१) रोहीत उर्फ सारंग गजानन वय ३२ वर्ष रा. भारती प्लॉट, जुने शहर, अकोला,

२) संतोष जगदीश यादव वय २९ वर्ष रा. पावसाळे ले – आउट, कौलखेड, अकोला,

३) ऋषभ विलास रायबोले वय २० वर्ष, रा. आंबेडकर नगर, नविन बस स्टैंड मागे, अकोला,

४) तुषार उर्फ चिकु आनंद लोंढे वय २१ वर्ष रा. शंकर नगर, अकोट फाईल, अकोला,

५) विशाल देवलाल सदांशिव, वय २१ वर्ष, रा कपील वस्तु नगर, शिवणी, अकोला

वरील पाचही आरोपीतांविरूध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचे विरूध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च कलम ५६ (अ) (ब) अन्वये अकोला जिल्हयातुन हद्दपार करण्या बाबत प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचे कडे सादर करण्यात आला होता.

त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचे आदेशान्वये उपरोक्त वर नमुद पाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना अकोला व बाळापुर तालुक्यातुन सहा महिण्याकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन जिल्हयात कायदा व सुव्यवस्थे अबादीत राहुन शांतता रहावी यासाठी कार्यवाहीस न जुमानणा-या सराईत आरोपीतांविरूध्द प्रतिबंधक कार्यवाही करणे सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!