अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ४ सप्टेंबर २०२३ :- श्रावणातील चौथ्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा व पालखी मिरवणूक लक्षात घेऊन हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे, तसेच विविध अधिका-यांना जबाबदा-या नेमून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. कावड, पालखी उत्सव निमित्त अकोला शहरामध्ये व मिरवणूक मार्गाकरीता उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद जावळे यांना इंसिडंट कमांडर म्हणून नेमण्यात आले आहे.

गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पुलावर लायटिंगची व्यवस्था, आपातापा चौकात वॉच टॉवर, मंदिर परिसरात बांबू बॅरेकेटिंग, पालखी मार्गावरील सर्व उपाहारगृहे, तात्पुरत्या खाद्यगृहांची तपासणी, मिरवणूक मार्गावर अधिकारी, कर्मचा-यांची 3 शिफ्टमध्ये पथके नेमणे आदींसाठी डेप्युटी इंसिडंट कमांडर म्हणून महापालिका उपायुक्त गीता वंजारी यांच्याकडे जबाबदारी आहे.

सर्व भाविकांना स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरूस्ती, आवश्यक ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे, रस्तेसफाई, अतिक्रमण काढणे, अग्निशमन व्यवस्था, क्रेन, वैद्यकीय पथके, संवेदनशील भागात, चौकात सीसीटीव्ही आदी व्यवस्था उभारण्याचे आदेश आहेत.

गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरचा घाट व पुलावरील तुटलेले कठड्यांची दुरूस्ती, घाटावरील स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, पूर्णा नदी पात्रापासून ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याबाबतच्या अडचणी दूर करणे, दुरूस्ती, पाणी पुरवठा टँकरच्या ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकून जागा व्यवस्थित करणे, गांधीग्राम घाटावर अकोटकडून येणा-या कच्चा रस्त्यावर मुरूम टाकून रोलिंग, मिरवणूक मार्गावर बाजूला रिफ्लेक्टर, आपातापा चौक ते पाचमोरी रस्त्यातील दुभाजकाची दुरूस्ती आदी जबाबदा-या ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कथलकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर वल्लभनगर फाट्याजवळ टोलनाका आहे. तो काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

महिला कावड सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही, कायदा व सुव्यवस्था राखणे, रहदारी नियंत्रण, रस्त्यावर पेट्रोलिंग करणे, पालखीसोबत किमान 2 स्पीकर घेऊन जाण्यास परवानगी देणे, आवश्यक त्या ठिकाणी बॅरेकेटिंग, आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही, नियंत्रण कक्ष 24 तास चालू ठेवणे, मिरवणूक मार्गावरील अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ व बंदोबस्त, परिवहन विभागाकडून वाहनांची तपासणी आदी जबाबदा-या उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, तहसीलदार संतोष शिंदे आदींना सोपविण्यात आल्या आहेत.

मार्गावर वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, औषधसाठा आदी विविध जबाबदा-या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

कासली फाटा, उगवा फाटा, घुसर फाटा, भोड फाटा, प्रेशर पॉईंट येथे लाईटची व्यवस्था, नियमित वीजपुरवठा, लोंबकळणा-या वीजतारा हटविणे, घाटावर प्रकाशाची व्यवस्था आदी कामे महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत पैकिने व इतर अधिका-यांवर सोपविण्यात आली आहेत.

गांधीग्राम येथे आपातकालीन पथक, बोटची व्यवस्था करणे, नियंत्रण कक्ष 24 तास चालू ठेवणे, कावड व पालखी उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यकारी‍ दंडाधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी यांची पथके गठित करणे आदी जबाबदा-या तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!