Saturday, December 7, 2024
Homeक्राईममोठी घटना रोखण्यास स्थानिक गुन्हेशाखा पथकला आले यश दोन पिस्टल व दोन...

मोठी घटना रोखण्यास स्थानिक गुन्हेशाखा पथकला आले यश दोन पिस्टल व दोन तलवारी सह तीन आरोपीना अटक

अकोला न्युज नेटवर्क दिनांक 16 जुलै :- अकोला शहरातील वाढत्या गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुंगे यांनी पोलीस खात्यातील मुख्य विभाग असलेल्या गुन्हे शाखेची जबाबदारी यवतमाळ जिल्ह्यातून आलेले पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्यावर सोपवली जबाबदारी सोपवतच प्रदीप शिरस्कार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून अकोल्यातील गुन्हेगारांचे धाबे दाणाणून टाकत आज देखील एक मोठी कारवाई करत पुढे घडणारी मोठी घटना थांबवली.

अकोला शहरात काही युवक देशी कट्टा (पिस्टल) व इतर हत्यार विक्री करीत असल्याची माहिती स्थिनिक गुन्हे शाखेला मिळाली पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांनी त्वरित आपल्या पथकला कारवाई करण्यास सांगितले असता पथकाने आपल्या परीने माहिती गोळा करण्यास सुरवात केली. सदर प्रकरणात एक आरोपी अकोला शहरातील रजपूत पुरा येथील एका युवकाने काही घातक शस्त्र विक्री केले असल्याची माहिती पथकला मिळताच पथकाने सदर ठिकाणी आपला सापळा रचला आणी अलगत त्यात खोलेश्वर येथील रहिवासी संमू राजपुत आरोपी अडकला.

पोलिसांनी आरोपी संमू राजपुत यास विचारपूस केली असता आधी त्याने उडवा उडविची उत्तरे दिली जसा पोलिसांनी आपला खाक्या दावण्यास सुरवात केली तसेच या आरोपीने पोपटा सारखे बोलण्यास सुरवात आपण दोन देशी पिस्टल ७ राऊंड बंदूकीच्या गोळ्या व दोन लोखंडी धारधार तलवारी हरी झाडे राहणार गौरक्षण रोड व आकाश आसोलकर राहणार उमरी यांना विकल्याची कबुली दिली.

स्थानिक शाखेच्या पथकाने लगेच आपला मोर्चा तिकडे वळवून मोठी उमरी परिसरातील आकाश असोलकर व गौरक्षण रोड येथील रहिवासी हरी झाडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एक गावठी बनावटीची पिस्टल, एक गावठी बनावटीच रिव्हाल्वर, ७ राउंड (बंदुकीचा गोळया) दोन धारदार लोखंडी तलवार असा एकुण १ लाख १३ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी संमु राजपुत राहणार खोलश्वर अकोला, हरी झाडे राहणार गौरक्षण रोड अकोला व आकाश आसोलकर राहणार उमरी अकोला यांचे विरुध्द पोलिस स्टेशन सिव्हील लाईन व पोलिस स्टेशन खदान येथे कलम ३/२५,४/२५ आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.

ही धडाकेबाज कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, यांच्या मर्दर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सैफी, दशरथ बोरकर, राजपाल ठाकुर, गणेश पांडे, फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक धिरज वानखेडे, मोहम्मद आमीर, लिलाधर खड़ारे, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp