अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ८ एप्रिल अनुराग अभंग अकोला :- Akola Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा मतदारसंघात पाच टर्म खासदार राहिलेले भाजपचे संजय धोत्रे यांची प्रकृती खराब असल्याने अंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिल्याने जिल्ह्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या नाराजीला मोठा धक्का देत, भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी देखील घराणेशाहीच्या आरोपासह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे काँग्रेसच्या अभय पाटील यांच्या उमेदवारीवर मतविभाजनाचा प्रभाव पडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर अकोला भाजपने नारायण गव्हाणकर यांच्या मनधरणीला सुरुवात केली. बऱ्याच चर्चांनंतर अखेर नारायण गव्हाणकर यांनी आज शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला आहे.
नेमकी का घेतली माघार? Akola Lok Sabha Election 2024
अकोला मतदारसंघात अपक्षांच्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने भाजपच्या उमेदवाराला मोठा आव्हान निर्माण झाले होते. या आव्हानाला तोंड देण्यासाठी नारायण गव्हाणकर यांची मनधरणी करावीच लागणार होती या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचे दिसत आहे. रात्री दोन वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नारायण गव्हाणकर यांना फोन आला त्या नंतर मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नारायण गव्हाणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
नारायण गव्हाणकर यांनी आज शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेत निवडणूक रणांगणातून माघार घेतली आहे. नारायण गव्हाणकर यांच्या या निर्णयाचा त्यांच्या भविष्यातील राजकीय हालचालींवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.