Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीAkola Lok Sabha Election 2024 अर्ज माघारीचा घेण्यास काहीच तास शिल्लक; प्रचाराचा...

Akola Lok Sabha Election 2024 अर्ज माघारीचा घेण्यास काहीच तास शिल्लक; प्रचाराचा धुराळा उडणार अपक्षांच्या माघारीकडे प्रस्थापित उमेदवारांचा लागले लक्ष

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक ८ एप्रिल :- Akola Lok Sabha Election 2024 अकोला लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय रणधुमाळीची तयारी सुरु होण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 40 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती, त्यापैकी 17 जणांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले तर 11 जणांचे अर्ज नाकारण्यात आले.

स्वीकृत करण्यात आलेल्या Akola Lok Sabha Election 2024 उमेदवारांमध्ये भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, अपक्ष उमेदवार नारायण गव्हाणकर, मुरलीधर पवार, मो. एजाज मो. ताहेर, धर्मेंद्र कोठारी, अशोक थोरात, रत्नदीप गणोजे, बहुजन समाज पार्टीचे काशिनाथ धामोडे, इंडियन नॅशनल लीगचे शेख नजीब शेख हबीब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल) ची प्रीती सदांशिव, जनसेवा गोंडवाना पार्टीचे बबन सयाम, जय विजय पार्टीचे रविकांत अढाऊ, अपक्ष दिलीप म्हैसने, गजानन दोड आणि प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे अ‍ॅड. उज्ज्वला राऊत यांचा समावेश आहे.

अकोला Akola Lok Sabha Election 2024 भाजपा मधून बंडखोरी करत नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप ची डोकेदुखी वाढली आहे त्यातच नारायण गव्हाणकर यांनी आपला अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. काल रविवारी प्रहार जनशक्ती पार्टीने देखील काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना समर्थन दिले तर घराणेशाहीचा आरोप करत नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता नारायण गव्हाणकर अपक्ष म्हणून लढतात की आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात हे काही तासात समजूनच येईल.

या मोठ्या सख्यतेने अपक्ष उमेदवार रिंगणात आल्याने मतविभाजन होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून या अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत असून त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे आणि प्रचाराला वेग येणार आहे.

या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीची तयारी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रचारावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे पक्षांकडून या उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज दुपारी 3 वाजेनंतर या मतदारसंघातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे.

आज होणार चिन्हांचे वाटप ! Akola Lok Sabha Election 2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सोमवार, ८ एप्रिल रोजीच दुपारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा सुरू होणार असल्याचे चित्र आहे.

उमेदवारांचे संपर्क दौरे; बैठका, गाठीभेटी सुरू ! Akola Lok Sabha Election 2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत असली तरी, उमेदवारी अर्ज मंजूर झालेल्या काही उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचारकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून संपर्क दौरे, बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू झाल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रचार वाढला! Akola Lok Sabha Election 2024
अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने लढतीचे चित्र स्पष्ट होताच प्रचाराला वेग येणार आहे. दरम्यान आता डिजिटल युगामध्ये प्रचारही डिजिटल करण्याकडे उमेदवारांचा कल वाढला आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!